Monday, 1 August 2022

व्यास क्रिएशन्स ठाणे आयोजित श्रीगणेश आरास व सजावट स्पर्धाचे आयोजन !

व्यास क्रिएशन्स ठाणे आयोजित श्रीगणेश आरास व सजावट स्पर्धाचे आयोजन !


मुंबई, (शांताराम गुडेकर) :
             गणपती महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि गणेशोत्सव म्हणजे मराठी माणसाच्या मनाचा हळवा कोपरा. कोकण आणि गणपती हे तर अनोखे नाते. बाप्पांच्या आगमनापूर्वीच घरात लगबग सुरू झालेली असते. प्रत्येक जण आपापल्या परीने गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला असतो. घरगुती गणपतींना होणारी सजावट लक्षात घेता व्यास क्रिएशन्सतर्फे कोकण प्रांतांसाठी घरगुती श्री गौरी गणपती आरास व सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण आणि स्पर्धा जाहीर करण्यात आली. यावेळी व्यास क्रिएशन्सचे संचालक नीलेश गायकवाड, राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशनच्या सीईओ वैशाली गायकवाड उपस्थित होते. सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ लोकमान्यांनी रोवली. ज्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीची दिशा बदलली. भारतीय समाजात चेतना जागृत करण्याचे आणि स्वातंत्र्य चळवळीला जन-चळवळीचे स्वरूप देण्याचे कार्य केले. लोकमान्य आणि कोकणचे अतूट नाते आहे. कोकणची माणसं आणि कोकणातील गणेशोत्सव साऱ्यांच्या औत्सुक्याचा विषय आहे. कोकणातील घरगुती गणपती उत्सवाचे स्वरूप समजावे आणि उमजावे यासाठी ही स्पर्धा आयोजित करीत आहोत. ही स्पर्धा सामाजिक विषयाला वाहिलेली आणि आराजकीय स्वरूपाची असेल. तसेच विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे असे संचालक नीलेश गायकवाड यांनी स्पष्ट केले. सोशल माध्यमावर या स्पर्धेची सर्व माहिती प्रसारित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी 8652233676, 9967637255 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन संपन्न !!

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन संपन्न !! प्रत्येक मुलाला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे... दिवाणी न्या...