कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रगती प्रकाश कोंगिरे व तत्कालीन ग्रामसेवक नितीन देशमुख यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून तक्रारी करून ही कारवाई होत नसल्यामुळे या विरोधात ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आमरण उपोषण सुरू केले आहे. परंतु यातील कोणत्याही आरोपात काही तथ्य नसून केवळ "खुर्ची, साठी हे सर्व सुरू असून मला केवळ एक महिला म्हणून त्रास दिला जात आहे, आपण या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली असल्याचे सरपंच प्रगती कोंगिरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कल्याण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून म्हारळ ग्रामपंचायत ओळखली जाते, या ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी नितीन देशमुख आणि सरपंच प्रगती प्रकाश कोंगिरे यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला आहे, अनेक विकास कामे, कोरोना काळातील खर्च, हायमास खरेदी, मेडिक्लोअर, स्वर्ग रथ खरेदी, टि सी एल यासह अनेक गंभीर आरोप करत ग्रामपंचायत सदस्य महेश खोत, समाजसेवक महेश देशमुख, दतू साँगळे आणि त्यांचे सहकारी यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आमरण उपोषण सुरू केले आहे. तसे बँनर गावात लावलेले असून याला उत्तर देण्यासाठी आज सरपंच प्रगती कोंगिरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
ग्रामपंचायत कर्मचारी विकास धनगर यांना श्रध्दांजली वाहून त्यांनी उपोषण करणा-यानी केलेल्या एका एका आरोपाचे खडंन केले,त्या म्हणाल्या, मुळात ते ज्या गैरव्यवहाराचा आरोप करतात, तो आपल्या कार्यकाळातील नसून याचा आपला काही संबंध नाही, उलट यांच्या अनेक याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत, यांना केवळ खुर्ची पाहिजे, एक महिला म्हणून मला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे, आपल्या कार्यकाळात नागरिकांना कोणताही त्रास झाला नाही, कधी मोर्चा आला नाही, पाणी तुंबले नाही, हे यांना खूपते आहे, हे रिकामं टेकडे आहेत, त्यांना काही कामधंदा नाही, म्हणून हे उद्योग सुरु आहे. ही नाटक बंद करा असा इशारा देऊन आपण यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून आता मीच यांची एक एक प्रकरणे बाहेर काढणार आहे. असेही त्यांनी सांगितले. यावेळी सदस्य किशोर वाढेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष निलेश देशमुख, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कोंगिरे आदी मंडळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment