भिवंडी, दिं,६, अरुण पाटील (कोपर) :
एकनाथ शिंदे गट आणि भाजपने राज्यात सरकार स्थापन केलं आहे. शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मात्र शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील वाद प्रतिवाद आणखी वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर शिंदे गटाची बाजू लावून धरत होते.
शिवसेनेच्या टीकांना चोख प्रत्युत्तर देतात. मात्र केसरकर यांनी शुक्रवारी केलेल्या अनेक गौप्य स्फोटानंतर त्यांची शिंदे गटाच्या प्रवक्तेपदावरून उचलबांगडी होणार असल्याची शक्यता असून या पुढे कदाचित किरण पावसकर शिंदे गटाचे प्रवक्ते होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केसरकर यांनी अनेक खुलासे केले होते, त्यात आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा कट नारायण राणे यांनी आखल्याचा गंभीर आरोप दीपक केसरकर यांनी केला होता. याविरोधात आपण भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडे तक्रारही केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या आरोपा नंतर नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी केसरकर यांची उचलबांगडी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आदित्य ठाकरेंबद्दल जे बोललं जात आणि वस्तुस्थिती यामध्ये जमीनआस्मानचा फरक आहे. ही वस्तुस्थिती आहे की सुशातसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये नारायण राणे यांचा मोठा वाटा होता. ठाकरे कुटुंबियांवर आमच्यासारखे लोक जे प्रेम करतात ते यामुळं दुखावले गेले होते.
भाजपच्या अनेक ज्य़ेष्ठ नेत्यांचे माझे जवळचे संबंध आहेत त्यामुळं मी त्यांना विचारलं होतं की, तुम्ही तुमचा प्लॅटफॉर्म तुम्ही कसा वापरु देता. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की, आमच्या बहुतांश आमदारांचा अशा प्रकारच्या बदनामीला विरोध आहे, असं आपल्याला सांगण्यात आल्याचं केसरकर यांनी म्हटलं होतं.

No comments:
Post a Comment