*मनिलाल शिंपी सरांच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांची प्रेरणा मिळाली - डी. टी. शहादा*
शिरुड, संदीप शेंडगे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ससदे व ससदे टेकडी यांच्या संयुक्तपणे जि. प. प्राथमिक शाळा ससदे टेकडी येथे शिक्षण परिषद शिरूड दिगर केंद्राचे केंद्रप्रमुख चौधरी सर यांचा अध्यक्षतेखाली, गटशिक्षण अधिकारी डी. टी. वळवी, विस्तार अधिकारी श्रीमती ममता पटेल आर एस पी ठाणे कल्याण युनिटचे कमांडर राज्यपाल सन्मानित मनिलाल शिंपी, समाजसेवक, वृक्ष मित्र मानक चौधरी यांचा प्रमुख उपस्थितीत, आयोजित करण्यात आली होती.
यावेळी शंकर सोनवणे सरपंच ससदे, कृष्णा सामुद्रे उपसरपंच, बापू दशरथे व रामभाऊ गावित अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर चितळकर यांनी केले. मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपचे अध्यक्ष, आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ. मणिलाल शिंपी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळा शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील सहसंबंध याबाबत मार्गदर्शन केले. माझा सातपुड्याने मला राजधानीत जाऊन समाजसेवेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराजांचे प्रेरणा रुपी शक्ती दिली.
मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपच्या माध्यमातून, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील, स्वामीनारायण ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश ठक्कर, रोटी डे ग्रुप, जीजस इज लाईफ ट्रस्ट, धर्मसेवक डॉ. सोन्या पाटील, ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र देसले, अशा अनेक समाजसेवकांच्या सहकार्याने, संपूर्ण महाराष्ट्रात गोरगरिब विद्यार्थी, शेतमजूर, अपंग, दिव्यांग अश्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. तसेच कलापथकातील अहिराणी भाषेतील दारूबंदी, सर्वशिक्षा अभियानांतर्गत विविध गाणे, यावेळी सादर करून सर्व शिक्षक वृंदाचे मन आकर्षित केले. शैक्षणिक गाणी गाऊन दाखवले. वृक्षप्रेमी मानिकभाई चौधरी यांनी 2019 मध्ये शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आली पन्नास रोपे आज शंभर टक्के संगोपन केल्याबद्दल शाळेचे कौतुक केले. गटशिक्षण अधिकारी डी. टी. वळवी यांनी सुरवातीलाच शिंपी सरांसारखे व्यक्तिमत्व आज मला भेटले, खरे तर आज पूर्व आणि पश्चीम सोडून मी दक्षिणेकडे आलो. संत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांच्या कार्याचा वसा मला पहायला मिळाला. मनिलाल शिंपी सारखे समाजसेवक असतील तर ग्रामीण भागात स्वच्छ्ता आणि साक्षरता एकत्र बघायला भेटेल अशा शब्दात मनोगत व्यक्त केले. विस्तार अधिकारी ममता पटेल यांनीही शैक्षणिक मार्गदर्शन केले. मनिलाल शिंपी यांचे विचार, काव्य, आणि तुकडोजी महाराजांच्या कार्याचा आदर्श ऐकून मला आज आपल्या जिल्ह्यातील एक सर्व सामान्य माणूस महाराष्ट्राचा राजधानीत जाऊन समाजसेवेसाठी तत्पर आहे. समाजातील तळागाळापर्यंत मदत कशी करता येईल याविषयी केलेले मार्गदर्शन खूप मोलाचे आहे, मला आज सातपुड्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व भेटल्याचा अभिमान वाटत आहे असे प्रतिपादन केले. मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपचे प्रमुख आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांचा माध्यमातून पळासवाडा जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. केंद्रप्रमुख एस एन चौधरी यांच्याकडून ससदे टेकडी येथील विद्यार्थ्यांसाठी लेखन व चित्रकला साहित्य वाटप करण्यात आले श्री शिंदे सर मुख्याध्यापक शिरूड जिल्हा तसेच शिरसाठ सर मुख्याध्यापक वर्धे टेंभे यांचे कडून देखील विद्यार्थ्यांसाठी वाचन व लेखन साहित्य शाळेला भेट देण्यात आले. यानंतर मागील शिक्षण परिषद आढावा- एस एन चौधरी, NAS विश्लेषण - सिद्धार्थ बैसाणे ,मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान -निरंजन सोनवणे व श्रीराम अहिरे, विद्यांजली कार्यक्रम- राजेंद्र सानप, विद्याप्रवेश सीमा जगदाळे, रीड टू मी ॲप लक्ष्मी रुपदे केंद्रातील शैक्षणिक गरजा रतिलाल सामुद्रे यांनी आपापले विषय शिक्षकांसमोर सविस्तर मांडले. शिक्षण परिषदेतील सर्वच विषय महत्वपूर्ण होते. परिषदेस केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांची उपस्थिती लाभली कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर चितळे मुख्याध्यापक ससदे गोपाल गुरखा सर श्रीमती कामिनी पाटील, श्रीमती भारती पटेल, मोहन शिंपी मुख्याध्यापक ससदे टेकडी श्रीमती छाया न्हासदे, श्रीमती सविता मॅडम यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वर्गाने सहकार्य केले. संगीत विशारद मोहन शिंपी सरांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि शिक्षक बंधुभगिनिनीचे आभार मानले.



No comments:
Post a Comment