Monday, 8 August 2022

हरवलेल्या त्या चिमुकल्यांचा शोध लावणाऱ्या शुरांचा, व्यायाम शाळा संघाकडून यथोचित सन्मान !

हरवलेल्या त्या चिमुकल्यांचा शोध लावणाऱ्या शुरांचा, व्यायाम शाळा संघाकडून यथोचित सन्मान !


मुरबाड { मंगल डोंगरे } :- मुरबाड तालुक्यातील चिल्लारवाडी येथील हरवलेली पाच वर्षीय तीन मुलांना शोधून काढण्यात विशेष मेहनत घेणाऱ्यांचा शोध घेऊन, ठाणे जिल्हा व्यायाम संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय हंडोरे- पाटील यांनी आज त्या वाडीला प्रत्यक्षात खरे शोधक बब्याचीवाडी येथील एकनाथ यशवंत हिंदोळा व सुनिल नावजी ठोंबरा  व चिल्लारवाडी येथील रमेश अनंता वाघ यांचा व जंगलात हरवलेल्या मुलांचा यथोचित सत्कार केला.

         सुमारे तीस तास बेपत्ता असणाऱ्या चिमुकल्यांचा शोध लावल्या प्रकरणी घनदाट जंगलात काट्यातुन वाट काढत चिमुकल्यांचा शोध घेणाऱ्या शुरांचा शोध ठाणे जिल्हा व्यायाम शाळा संघाचे अध्यक्ष संजय हंडोरे पाटील यांनी त्यांचे सहकारी यांच्या सोबत त्यांचा यथोचित सन्मान करुन या शोध मोहिमेतील खरे वाटाडे उत्कृष्ट कामगिरी करून शाबासकी पासून बाजूलाच राहिल्यामुळे व्यायाम शाळा संघाच्या वतीने हंडोरे-पाटील यांनी त्या शुरांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता चिलारवाडी येथील तीन बालके अचानक गायब झाल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली होती. या आधी मुरबाड शहरातील दोन मुले गायब असल्याने वेगवेगळे तर्कवितर्क घेतले जात होते. या बालकांचा तपास गुलदस्त्यात असताना शिरवली परिसरातील चिलारवाडी या आदिवासी वाडीतील नितेश मोहन कडाळी, जयेश सुरेश वाघ, रवि सुरेश आघाणे ही तीन बालके ही शुक्रवारी सायंकाळी अंगणात खेळत असताना अचानक गायब झाल्याने त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र ती सापडत नसल्यामुळे पोलिसांना कळविण्यात आले व नागरिकांचे मदतीने सर्वत्र शोध मोहीम घेण्यात आली, शेकडो नागरिक व शासकीय यंत्रणा घनदाट जंगलात राञभर शोध घेत असतांना अपयश येत असल्याने आई वडिलांचा अकांत वाढत होता व पोलिसांचा तणाव देखील वाढत होता, परंतु नागरिकांनी शोध मोहीम सुरुच ठेवली असता. त्या वाडी पासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या साजई येथिल धरण परिसरात मुले सुखरूप सापडली,  त्या बालकांचे स्वागत करत प्रसिध्दी मिळविली मात्र ज्या तरुणांनी घनदाट जंगलात काट्यातुन वाट काढत त्या चिमुकल्यांचा शोध घेतला त्यांचे पाठीवर कुणी कौतुकाची थाप मारली नाही. म्हणुन संजय हंडोरे यांनी एकनाथ हिंदोळा, सुनिल ठोंबरा व रमेश वाघ या शुर विरांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान केला.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...