Friday, 2 September 2022

निर्माल्य संकलन मोहीम ! रोटरी क्लब ऑफ चोपडा यांचा स्तुत्य उपक्रम !!

निर्माल्य संकलन मोहीम ! रोटरी क्लब ऑफ चोपडा यांचा स्तुत्य उपक्रम !!


चोपडा / प्रतिनिधी :
गणेशोत्सवादरम्यान होणारे जलप्रदूषण कमी करण्यासाठी ‘रोटरी क्लब ऑफ चोपडा’ तर्फे निर्माल्य संकलन अभियान राबवण्यात आले.
शहरातील १० गणेश मंडळ यांना निर्माल्य संकलन बॉक्स देऊन या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. विसर्जनाच्या दिवशी सर्व निर्माल्य बॉक्स गोळा केले जातील व चोपडा नगर परिषद सोबत मिळून निर्माल्याचे कंपोस्ट खत तयार केले जाईल व निर्माल्यापासून तयार झालेल्या या खताचा वापर सार्वजनिक उद्यानात केला जाईल.

निर्माल्य संकलन बॉक्स वाटपात रोटरी अध्यक्ष ॲड. रुपेश पाटील, सचिव गौरव महाले, प्रकल्प प्रमुख संजय शर्मा, एम डब्लू पाटील, व्ही एस पाटील, धिरज अग्रवाल, महेंद्र बोरसे, चंद्रशेखर साखरे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

इंद्रा इंग्लिश हायस्कूलला एसडीजी पुरस्कार मिळाला !!

इंद्रा  इंग्लिश हायस्कूलला एसडीजी पुरस्कार मिळाला !! मुंबई, सुनील भोसले : रोजी सीईडी फाउंडेशनने मुंबईतील अरिचिड इंटरनॅशनल हॉटेलम...