महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या 'राज्य अध्यक्ष पदी संजीव निकम' तर 'राज्य सरचिटणीस पदी सुचित घरत' यांची बिनविरोध निवड, ठाणे कार्यकारिणी तर्फे भव्य सत्कार !
कल्याण, (संजय कांबळे) : ग्रामीण भागातील ग्रामविकासाची धुरा समर्थ पणे सक्षमरित्या व पारदर्शकपणे सांभाळणारी तसेच केंद्राच्या, राज्याच्या तथापि जिल्हा परिषदेच्या विविध विकासाच्या योजना व अभियान यशस्वी पणे राबविणारी इतकेच नव्हे तर जिल्हा ग्रामविकासाची 'गंगोत्री' आणि कर्मचारी चळवळीतील लढवय्ये बलाढ्य संघटना म्हणून ओळखले जाते, त्या महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या 'राज्य अध्यक्षपदी संजीव निकम' तर 'सरचिटणीस पदी सुचित घरत' यांंची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडी बद्दल ठाणे जिल्हा ग्रामसेवक कार्यकारिणी तर्फे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यामुळे भविष्यात ग्रामसेवकांचे विविध अडचणी, प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई १३६ ची बहुचर्चित राज्य पदाधिकारी मंडळाची निवडणूक विदर्भाची पंढरी, संत नगरी श्री गजानन महाराज निवासी शेगाव या पवित्र पावन भूमित खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच पार पडली, यामध्ये राज्य अध्यक्ष म्हणून संजीव निकम, राज्य सरचिटणीस सुचित घरत, दामोदर पटले, कार्याध्यक्ष, श्रीमती दुर्गा भालके महिला उपाध्यक्ष, भास्कर जाधव उपाध्यक्ष, अशोक भोसले कोषाध्यक्ष, कमलाकर वनवे संयुक्त सचिव आणि देवीदास चव्हाण, कायदेशीर सल्लागार, यांचा समावेश असून या सगळ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याशिवाय कोकण विभागात नाथा जमादार पाटील यांची रत्नागिरी विभागिय उपाध्यक्ष तर प्रमोद पांडुरंग पाटील यांची रायगड विभागीय सह सचिव म्हणून बिनविरोध निवड झाली.
सुचित घरत या युवा नेतृत्वाकडे ग्रामसेवक युनियन च्या राज्य सरचिटणीस पदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल ठाणे जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या कार्यकारिणी तर्फे श्री घरत यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी ठाणे जिल्हा ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष विवेक पाटील, सरचिटणीस नितीन चव्हाण, उपाध्यक्ष राजेश शेलार, सहसचिव दिलीप जाधव, शहापूर तालुका अध्यक्ष दिनेश विशे, मुरबाड सचिव जितू पवार, अनिल दांडेकर, अशोक बांगर, खाडे सर, निलेश म्हात्रे, प्रफुल्ल म्हात्रे, वैभव गोडसे, कुर्ले भाऊसाहेब, गणेश पडवळ, वैभव पडवळ व प्रसिद्ध प्रमुख मनिष महाजन यांच्या सह इतर असंख्य ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुचित घरत यांच्या सारख्या युवा नेतृत्वाची राज्य संघटनेचे सरचिटणीस पदी बिनविरोध निवड करुन महाराष्ट्रातील कोकण विभागाचा गौरव केला आहे. त्यामुळे निश्चितपणे ग्रामसेवकांचे विविध प्रश्न, अडचणी, समस्याची सोडवणूक होईल अशा विश्वास युनियनचे जिल्हा सरचिटणीस नितीन चव्हाण यांनी व्यक्त केला.
या सर्वांच्या बिनविरोध निवडीबद्दल ग्रामसेवकानी समाधान व्यक्त केले.



No comments:
Post a Comment