Monday, 26 September 2022

विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांच्या हस्ते आरतीने औरंगाबाद शहराचे ग्रामदैवत कर्णपुरा यात्रेला सुरवात !!

विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांच्या हस्ते आरतीने औरंगाबाद शहराचे ग्रामदैवत  कर्णपुरा यात्रेला सुरवात !!



*औरंगाबाद, अखलाख देशमुख / दि.२६ *

सुमारे ३५० वर्षांचा इतिहास असणारे औरंगाबाद शहराचे ग्रामदैवत  कर्णपुरा देवी यात्रेला आज सोमवार (२६ सप्टेंबर) पासून सुरुवात झाली प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी यात्रेची जय्यत तयारी केली असून नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्र उत्सवाची सुरुवात प्रथम दिनी पहाटे ३:०० वाजता विधीवत महापूजा, ७:०० वा. महाआरती, ७:१५ वा. घटस्थापना  हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते तथा संस्थापक अध्यक्ष अंबादास दानवे यांच्या हस्ते सपत्नीक आरती व घटस्थापना करून विधिवत  पूजन करून करण्यात आली.
नऊ दिवस धार्मिक उत्सवा बरोबरच भाविकांसाठी जागरण गोंधळ विविध कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी माजी महापौर नंदकुमार घोडेले संतोष दानवे, संतोष मरमठ, राजेंद्र दानवे, राजू राजपूत, अभिजीत पगारे, पराग कुंडलवाल, लक्ष्मण बताडे, जगन्नाथ दानवे, आकाश दानवे, नंदू लबडे, नारायण कानकाटे, प्रभात पुरवार, पोपटराव दानवे, अंबादास भानुदास दानवे, अनिल दानवे आदी भाविक भक्तगण माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

॥ भात शेती, आपली समृद्धी ॥

॥ भात शेती, आपली समृद्धी ॥ माणगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा कंबर कसूया आपल्या काळ्या आईला हिरवेगार करूया :  किरण पडवळकर तालु...