Tuesday, 25 October 2022

औरंगाबाद येथे मुलनिवासी सभ्यता संघाचे 26 - 27 ऑक्टोबरला पहिले राष्ट्रीय अधिवेशन !

औरंगाबाद येथे मुलनिवासी सभ्यता संघाचे 26 - 27 ऑक्टोबरला पहिले राष्ट्रीय अधिवेशन !


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २५ : मूलनिवासी सभ्यता संघाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन दिनांक 26 व 27 ऑक्टोबर 2022 रोजी औरंगाबादे येथील नागसेनवन  परिसरातील डॉ. आंबेडकर स्टेडियमवर संपन्न होत असून दोन दिवशीय या भव्यदिव्य अधिवेशनात बहुजनांच्या सामाजिक व कलाचारीक अशा भरगच्च कार्यक्रमांचा देशव्यापी संगम पाहायला मिळणार आहे,अशी माहिती मूलनिवासी सभ्यता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रभाकर निसर्गंध यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
 
डॉ. निसर्गंध म्हणाले की, मूलनिवासी सभ्यता संघ राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून भारतातील मूल सभ्यता जी मानवी मूल्यांवर आधरीत समतावादी सभ्यता होती.परंतु आज तिचे वेगळे रूप बघायला मिळत आहे. ती गौरवशाली सभ्यता पुनर्स्थापित करण्यासाठी आणि देशातील अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग व धर्म परिवर्तीत अल्प संख्याक लोकांच्या कला,गुणांना वाव देण्यासाठी मूलनिवासी सभ्यता संघ कटीबद्ध आहे.त्याच्याच एक भाग म्हणून औरंगाबाद येथे पहिल्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या स्वरूपविषयी निसर्गंध म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसमवेत महामानवांच्या शहरातील अभिवादन रॅलीनंतर 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता अधिवेशनाचे प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक मा. करुणा कुमार (आंध्रप्रदेश ) यांच्या हस्ते उदघाटन होईल. यावेळी जयंती फिल्मचे दिग्दर्शक मा. शैलेश नरवाडे (महाराष्ट्र), संगीतनाट्य अकादमी पुरस्कारप्राप्त पद्मश्री मा.मुकुंद नायक (झारखंड) यांची विशेष अतिथी म्हणून तर बामसेफचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष एस. एफ. गंगावणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता मा. एस. एस. भगत, संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रतिभा, बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गणोरकर उपस्थित राहतील.
 
या अधिवेशनात प्रसिद्ध शाहीर संभाजी भगत, फिल्म गीतावर व लेखिका मृदुला देवी, प्रसिद्ध चित्रकार बळी खैरे,रमा पांचाळ आणि दयारामजी यांना राष्ट्रीय स्तराचे त्या त्या क्षेत्रातील पुरस्कर देण्यात येतील. 

मुलनिवासी सभ्यता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निसर्गन्ध प्रभाकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना पुढे सांगितले की, अधिवेशनाला विविध राज्यातून येणारे कलाकार आपले कलाचारीक कार्यकम सादर करतील. शाहीर शीतल साठे आणि सचिन माळी  नवयान जलसा तर झारखंडचे जीतराई हासदा बोल पच्चासी नाटक  सादर करतील. फिल्म फेस्टिवल, चित्रपट डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म यामध्ये गिली पुच्ची, धम्मम, वैकुंठ, जयंती, कस्तुरी, कास्ट इन मेनू कार्ड, दंगल, आदी कलाकृती सादर केल्या जातील.

27 ऑक्टोबर 2022 ला देशाच्या विविध राज्यातून जसे  गुजरात, उत्तर प्रदेश, गाजीपुर, झारखंड, गुवाहाटी, महाराष्ट्र, बिहार, दिल्ली, पंजाब, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी ठिकाणाहून आलेले कलावंतही आपले सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. या दोन दिवसीय अधिवेशनाची सांगता पुरस्कार वितरणाने होईल. सायंकाळी आयोजित या कार्यक्रमाला केरळ फिल्मचे डायरेक्टर जीवा जनार्दन,मल्याळम फिल्मचे गीतकार मृदुलादेवी, मूलनिवासी संघाचे हानी हंसलोद, झारखंडचे गीतकार पद्मश्री मधुश्री मंजिर, बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एन. गंगाधर, डॉ. निसर्गंध प्रभाकर आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करतील अशी माहितीही डॉ.प्रभाकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
पत्रकार परिषदेला मूलनिवासी सभ्यता संघाचे राष्ट्रीय महासचिव हिम्मत वैद्य,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धीरज गणवीर, अधिवेशनाचे मुख्य संयोजक ऍड. विजय वानखडे, धनंजय झाकर्डे,जीवन गावंडे, बी.बी. साळवे, भाऊराव अंभोरे, दुष्यंत पाटील, विकास शिरसाट, संदीप जाधव, प्रसिद्ध प्रमुख गजानन बोदडे, आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव !

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव ! मुंबई (शांताराम गुडेकर)          ...