मान्यवरांसह 'महापौर सौ.जयश्री महाजन' यांच्या उपस्थितीत जळगावात "लेवा पाटीदार बिझनेस एक्सपो"चा थाटात शुभारंभ !
जळगाव, अखलाख देशमुख, दि.३० : गोदावरी फाऊंडेशन प्रायोजित तथा लेवा चेंबर ऑफ कॉमर्स आणि ग्लोबल लेवा पाटीदार फाऊंडेशनच्या वतीने शहरातील सागर पार्क येथे 'लेवा पाटीदार बिझनेस एक्सपो' या प्रदर्शनाचे मान्यवरांसह शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या संचालिका तथा जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ञ संचालिका सौ. जयश्री सुनिल महाजन यांच्या उपस्थितीत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेचे चेअरमन अनिकेत भालचंद्र पाटील हे होते.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते तथा विधान परिषद सदस्य आ.एकनाथराव खडसे, शहराचे आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, सुदर्शन पेपर अँण्ड प्रॉडक्टचे संचालक राजीव चौधरी, कृष्णा पेक्टिन्सचे के.सी. पाटील, चौधरी टोयोटाचे संचालक महेश चौधरी, गोदावरी फॉउंडेशच्या डॉ.सौ.केतकी वैभव पाटील, सोनी एजन्सीजचे संचालक जीवन येवले, स्टार फेब्रिकेटर्सचे संचालक रवींद्र अत्तरदे, खोशल प्लास्टो पॅक प्रा.लि.चे संचालक चंदन अरुण नारखेडे,चंदन कोल्हे,रवींद्र पाटील यांच्यासह आदी मान्यवर, व्यवसायिक व उद्योजक तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ऐतिहासिक अशा लेवा पाटीदार बिझनेस एक्सपो प्रदर्शनात १५० हुन अधिक स्टॉल प्रदर्शनस्थळी लावण्यात आले आहेत. उदघाटन सोहळ्याला एक्सपोचे आयोजक मंडळ व लेवा पाटीदार समाजातील प्रतिष्ठित व्यावसायिक आणि जळगावकर बंधू-भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment