औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ०१ : राज्य शासनाने त्यांचे आदेश क्रमांक : व्हीपीएम-२०२२/प्र.क्र.३०१पं.रा- ३, दि ३०/९/२०२२ नुसार राज्यातील सर्व मुख्यकार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद यांना आदेशीत केले आहे की,सारथी संस्थेअंतर्गत राबविण्यात येणा-या योजनांच्या माहितीचे दि.२.१०.२०२२ च्या ग्रामसभेमध्ये चावडी वाचन करण्या बाबत उपसचिव श्री.दे.लोंढे महाराष्ट्र शासन यांचे स्वाक्षरीने निर्देश दिले असुन त्यात नमुद केले आहे की, राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा कुणबी या लक्षीत गटातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी कंपनी कायदा २०१३ चे कलम ८ खाली "सारथी" संस्थेची नोंदणी १५ जुन २०१८ रोजी करण्यात आलेली आहे.
सदर संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची व उपक्रमांची माहिती जनमाणसा पर्यंत पोहोचवण्या करीता सदर योजनांचे ग्रामसभे मध्ये चावडी वाचन केल्यास या योजनांची माहिती लक्षीत गटातील व्यक्ति पर्यन्त पोहोचू शकेल व पात्र लाभार्थींना या योजनेचा लाभ घेता येईल. सारथी संस्थेच्या योजनांची माहिती ग्रामसभेत वाचल्यास ग्रामीण भागातील खेड्या पाड्या मधील लक्षीत गटातील व्यक्ती पर्यंत पोहोचण्यास, निश्चितच मदत होईल.
या पत्रासमवेतच्या परिशिष्ट 'अ' मधील सारथी संस्थे मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहितीचे दि.०२ आक्टोबर २०२२ रोजीच्या ग्रामसभेमध्ये वाचन करण्याबाबत अधिनस्त सर्व ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांना आदेशीत करण्या बाबत सुचना देण्यात आल्या आहेत.३० सप्टेंबर, २०२२ रोजीच्या या पत्राची प्रत सर्व विभागीय आयुक्त यांना तत्काळ कार्यवाही साठी अग्रेशित सुद्धा केलेली आहे.
ग्रामीण भागातील संशोधक छात्र, स्पर्धा परीक्षा- आठवी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी यासह अनेकांना या दवंडी प्रक्रियेचा लाभ होणार असल्याचे मत जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत विशेष बातचीत करतांना व्यक्त केले असुन सारथीची संचालक मंडळ यासह कार्यकरी संचालक अशोक काकडे व सर्व कर्मचारी यांचे खुप खुप आभार व्यक्त करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment