Monday, 3 October 2022

रंगारी बदक चाळीत 'महिला पोलिसां'चा सत्कार !!

रंगारी बदक चाळीत 'महिला पोलिसां'चा सत्कार !!


मुंबई (शांताराम गुडेकर) :
          रंगारी बदक चाळ येथील श्री समर्थ हनुमान मंडळाच्या ६८ व्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या सामाजिक बांधीलकीतून कायदा व सुव्यवस्था हाताळणाऱ्या विशेषतः रंगारी बदक चाळीत राहणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा शिवसेना भायखळा विधानसभेच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला. 


या सन्मान सोहळ्यास शिवसेना उपनेते व माजी नगरसेवक श्री. मनोज जामसुतकर, माजी नगरसेविका सौ. सोनम जामसुतकर, माजी नगरसेविका अंजली ताई मोरे व शिवसेनेचे महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह श्री समर्थ हनुमान मंडळाची विद्यमान महिला कार्यकारिणी अध्यक्षा सौ. कांता कदम, कार्याध्यक्षा सौ. रेश्मा माणगावकर, सरचिटणीस सौ. नमिता दळवी, खजिनदार सौ. रोहिणी परब यांच्यासह मंडळाच्या महिला व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे उपाध्यक्ष श्री. सुशांत नाईक यांनी केले याची मंडळाचे प्रसिद्धी माध्यम प्रमुख दादासाहेब येंधे यांनी माहिती दिली.

No comments:

Post a Comment

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ !

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ ! *शिवसेना उपशहर प्रमुख विजय देशेकर यांचा स्तुत्य उपक्रम* टिटव...