Thursday, 16 January 2025

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ !

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ !

*शिवसेना उपशहर प्रमुख विजय देशेकर यांचा स्तुत्य उपक्रम*

टिटवाळा, संदीप शेंडगे : येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणेश मंदिरात शिवसेना उपविभाग प्रमुख विजय देशेकर यांच्या सहकार्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. 

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात टिटवाळा येथे  प्राचीन आणि सुप्रसिद्ध नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असलेल्या सिद्धिविनायक मंदिर आहे या मंदिरात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत आहेत परंतु येथे भाविकांसाठी कोणत्याही प्रकारची अन्नदानाची सोय उपलब्ध नव्हती. भाविकांचे अडचण लक्षात घेऊन शिवसेनेचे उपविभाग प्रमुख विजय देशकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पार्किंग जवळ दर मंगळवारी भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू केले आहे या अन्नछत्राचे उद्घाटन विजय देशेकर आणि माजी नगरसेवक संतोष तरे यांच्या हस्ते करण्यात आले.
देशातील प्रमुख आणि प्रसिद्ध मंदिरांमध्ये मोफत अन्नदान महाप्रसादाची सोय उपलब्ध आहे यामध्ये शिर्डीतील साईबाबा मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर, तुळजाभवानी मंदिर, आदी मंदिरांमध्ये मंदिर ट्रस्ट कडून मोफत अन्नदानाची सोय करण्यात येते हजारो भाविकांना ट्रस्ट कडून मोफत महाभोजन प्रसादाचे दान केले जाते. परंतु टिटवाळ्यात लाखो भाविक येत असून दानपेटीत भरभरून दान करीत आहेत तसेच अनेक भाविक सोन्या चांदीचे दागिने व वस्तू गणरायाला अर्पण करीत आहेत काही भाविक अधिकृत पावत्या फाडून भरभरून रोख स्वरूपात दान करीत आहेत परंतु येथील मंदिर ट्रस्ट भाविकांसाठी मोफत अन्नदानाची सोय करीत नसल्याची खंत उद्घाटन प्रसंगी विजय देशकर यांनी व्यक्त केली.

तसेच टिटवाळ्यात महागणपती दवाखाना आहे परंतु महागणपती दवाखाना हा खाजगी स्वरूपात असून  या दवाखान्यामध्ये नागरिकांना मोफत वा अल्प दरात ट्रस्टच्या माध्यमातून कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याचे देशकर यांनी सांगितले. 

देशेकर यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे टिटवाळ्यातील नागरिकांनी स्वागत केले असून सध्या दर मंगळवारी मोफत अन्नदान होत असले तरी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी लवकरच प्रत्येक दिवशी मोफत अन्नदानाची सोय उपलब्ध करण्यात येईल असे विजय देशकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ !

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ ! *शिवसेना उपशहर प्रमुख विजय देशेकर यांचा स्तुत्य उपक्रम* टिटव...