"नायगाव येथे मुस्लिम बहुल गावात शिवसेना शाखेचे उद्घाटन"
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २ : तालुक्यातील नायगाव येथे मुस्लीम बहूल गावात शिवसेनेची शाखा होतेय ही परिवर्तनाची नांदी ठरतेय असे प्रतिपादन विरोधीपक्ष नेते आंबादास दानवे यांनी केले.
नायगाव येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंचावर उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे,किसान सेना उपजिल्हाप्रमुख नानासाहेब पळसकर,तालुकाप्रमुख शंकरराव ठोंबरे,युवा तालुकाप्रमुख राजू चव्हाण,दलित आघाडीचे दिपक कणसे,शाखाप्रमुख अब्बास कुरेशी,उपशाखा प्रमुख अहमद शेख,युवा सेना तालुका अधिकारी अकाश लेंभे, बबनराव वाघ, भाऊसाहेब सपकाळ,गणेश दांडगे,नारायण पठाडे,शुभम पिवळ,रफीक पैलवान,कलीम कुरेशी,संजय वाघ,विलास मुळे,सलीम पटेल वायगांवकर आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवसेना शाखेचे ना.अंबादास दानवे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
पुढे बोलताना ना.दानवे म्हणाले की, शिवसेनेची विचारसरणी ही हिंदूत्ववादी आहे परंतु मुस्लीमांना विरोध करण्याची नाही. मुस्लीम बांधवांनी शिवसेनेसोबत रहावे, आतापर्यंत शिवसेनेची भूमिका ही न्याय देण्याची राहिलेली आहे. भविष्यात या भागातील विकासाला प्राधान्य देऊन, या शाखेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवा तसेच शिवसेना पहिले एक संघटना असून ८०% समाजकारणाला प्राधान्य देते, मग राजकारण करावे शाखेच्या पदाधिकारी यांच्याकडून अशाच प्रकारची आपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी शिवसेनेच्या महिला आघाडी, शिवसैनिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment