Tuesday, 4 October 2022

वंदे मातरम् ला विरोध करून काँग्रेस ने देशविरोधी मानसिकता दाखवली !

वंदे मातरम् ला विरोध करून काँग्रेस ने देशविरोधी मानसिकता दाखवली !

*भाजपा चे प्रदेश प्रवक्ते एजाज देशमुख यांची टीका*


औरंगाबाद दि ४ ऑक्टोबर: सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दूरध्वनीवर हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणावे या राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध करून काँग्रेस ने आपली देशविरोधी मानसिकताच दाखवली आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते एजाज देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. वंदे मातरम् विरोध करणारे कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्वातंत्र्य संग्रामात वंदे मातरम् म्हणत म्हणत फासावर चढलेल्या हुतात्म्यांचा अपमान केला असून त्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
 
शासकीय कर्मचाऱ्यांनी दूरध्वनीवर बोलण्यास सुरुवात करताना हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणावे, या राज्य शासनाच्या निर्णयाला माजी मंत्री व कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विरोध केला आहे. या संदर्भात बोलताना एजाज देशमुख म्हणाले की,वंदे मातरम् हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहे.भगत सिंह, राजगुरू यांच्या सारखे अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेले सामान्य कार्यकर्ते वंदे मातरम् म्हणतच फासावर चढले. बाळासाहेब थोरात यांना हा इतिहास माहीत नाही असे शक्य नाही. तरीही त्यांनी वंदे मातरम् ला विरोध करणे दुर्दैवी आहे.

पंडित नेहरूंच्या पणतू च्या काळात कॉंग्रेसची राष्ट्रप्रेमाची व्याख्या कदाचित बदलली असावी. त्या मुळे भारत तेरे तुकडे होंगे या सारख्या देशविरोधी घोषणा देणाऱ्या प्रवृत्तींना नेहरूंचे पणतू राहुल गांधींनी पाठिंबा दिला. भारत जोडो म्हणत यात्रा काढायची आणि दुसरीकडे वंदे मातरम् ला विरोध करायचा यातून काँग्रेस चा दुटप्पी, ढोंगी चेहरा उघड झाला आहे, असेही एजाज देशमुख यांनी नमूद केले.
देशविरोधी भूमिका घेतल्या बद्दल बाळासाहेब थोरात यांनी तातडीने माफी मागावी, अन्यथा त्यांना जनतेच्या संतापास सामोरे जावे लागेल, असा इशाराही देशमुख एजाज यांनी दिला.

No comments:

Post a Comment

'लावण्य दरबार'च्या यशानंतर 'पाव्हणं जरा जपून' कार्यक्रमाचे वाशी आणि भायखळा येथे आयोजन !

'लावण्य दरबार'च्या यशानंतर 'पाव्हणं जरा जपून' कार्यक्रमाचे वाशी आणि भायखळा येथे आयोजन ! मुंबई, (शांताराम गुडेकर)...