*पोलीस भरती संघटनेचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निवेदन*
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ४ : महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू असून संपूर्ण राज्यात प्रामुख्याने सर्वसाधारण सामान्य कुटुंबातील मुले / मुली तसेच ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहे. परंतु गृह विभागाच्या वतीने महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश ) सुधारणा अधिनियम २ मार्च २०२२ नुसार मुद्दा क्रमांक २ मधील महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ च्या नियम ८ च्या पोटनियम ३ नंतर पुढील पोटनियम समाविष्ट करण्यात येणाऱ्या (तीन - अ) राष्ट्रीय छात्र सेना एनसीसी प्रमाणपत्र धारण केलेल्या उमेदवारास अ, ब, क या तीन गटात विभागून त्यांना भरती प्रक्रियेतील एकूण गुणांच्या २, ३,५ टक्के बोनस मार्क देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मेहनत करून स्पर्धेत लढणाऱ्या उमेदवारास काहीच महत्त्व राहणार नाही. अतिशय परिश्रम घेऊन मेरिटमध्ये येण्याचा प्रयत्न उमेदवार करत असतो, त्यात काही उमेदवार १/२ मार्कांनी वेटिंग ला देखील असतात, अशावेळी सात मार्क कमी असलेला एनसीसी प्रमाणपत्र धारक उमेदवार मागून येऊन प्रमाणपत्राच्या आधारे पुढे जाऊन पात्र ठरतो, यामुळे पोलीस शिपाई भरती ही स्पर्धा परीक्षा राहिलेली नसून ती एनसीसी प्रमाणपत्र धारक उमेदवारांची स्पर्धा झालेली आहे. शासनातील नेतेमंडळी त्यांच्या सत्तेच्या लालसेपोटी सोयीनुसार वेळोवेळी निर्णय बदलत असून पोलीस भरती व इतर भरती प्रक्रिये संदर्भात वारंवार खोटी आश्वासने देऊन समाजात वाढणाऱ्या युवा शिक्षित बेरोजगार युवकांच्या जीवाशी खेळत आहे, हा शासन निर्णय सर्वसाधारण गटात मोडणाऱ्या पोलीस भरतीत येणाऱ्या उमेदवारांवर अन्यायकारक आहे, यावर सविस्तर विचार विनिमय करून सदरील परिपत्रक (जीआर) रद्द करावा या मागणीसाठी पोलीस भरती संघटनेचे उमेदवार, विद्यार्थी यांनी *राज्याचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची आज भेट घेऊन त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत बाजू मांडली व ना. दानवे यांना निवेदन दिले.*
याबाबत विधानपरिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी सदरील विषय राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन या शासन निर्णयाबाबत चर्चा केली जाईल, विधिमंडळात या शासन निर्णयाविषयी आवाज उठवून, गरज पडल्यास रस्त्यावर उतरून एनसीसी उमेदवार व एनसीसी नसलेले उमेदवार या दोघांनाही समान न्याय कसा देता येईल यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन यावेळी ना.दानवे यांनी पोलीस भरती उमेदवारांना दिले.
No comments:
Post a Comment