Tuesday, 4 October 2022

अधिस्विकृती धारक पत्रकारांना कोरोना काळापासून बंद असलेल्या रेल्वेमधील सवलत पुन्हा सुरू करावी !

अधिस्विकृती धारक पत्रकारांना कोरोना काळापासून बंद असलेल्या रेल्वेमधील सवलत पुन्हा सुरू करावी !

"युवा शक्ती पत्रकार संघाचे अध्यक्ष अब्दुल कय्यूम यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मांगणी"


औरंगाबाद, अखलाख देशमुख- दि ३ : अधिस्विकृतीधारक पत्रकारांना कोरोना काळापासून बंद असलेल्या रेल्वेमधील सवलत पुन्हा सुरू करावी अशी मागणी युवाशक्ती पत्रकार संघाचे अध्यक्ष अब्दुल कय्युम यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी केली आहे.

केंद्र शासनाच्या परिपत्रक २०२२ (४५) नुसार अधिस्विकृती पत्रकारांना आपल्या रेल्वेमध्ये प्रवास सवलती देण्याबाबत आदेश जारी केले आहेत मात्र अद्यापही या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्यासंदर्भात
रेल्वे विभागाला आदेश द्यावेत व पत्रकारांच्या प्रवासाच्या तिकीट दरान सवलतीत ५० टक्के सुट देण्याची सेवा सुरू करावी. अगोदरच पत्रकारांची वाईट अवस्था झालेली आहे.

कोरोनाकाळात बंद झालेली सुविधा आपल्या निगरानीत पत्रकारांना पुन्हा सवलती देऊन सुरू करावी अशी मागणी युवा शक्ती पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अब्दुल कय्युम यांनी केली आहे. यावेळी जेष्ट संपादक मुशाहेद सिद्दीकी, शेख मोहम्मद ईसाकोद्दीन, फोटोग्राफर अनिस रामपुरे यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून राजकारण संपवण्याचा प्रयत्न.....

शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून राजकारण संपवण्याचा प्रयत्न..... नालासोपारा, प्रतिनिधी :-  शि...