शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून राजकारण संपवण्याचा प्रयत्न.....
नालासोपारा, प्रतिनिधी :- शिवसेना विभाग प्रमुख संतोष कोबनाक यांनी रुचिता नाईक यांच्या वर खोटे आरोप करत जीवे मारण्याची धमकी दिली असे खोटे गुन्हे दाखल करून महिलांचे (रुचिता नाईक) राजकारण संपवण्याचे काम करतं आहेत.
शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.
नालासोपारातील नागरीकांसाठी मोफत रूग्णवाहिका घेतल्याचा राग व विधानसभेत केलेल्या कामाचा राग मनात धरून त्याचा राग शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्यावर धमकी व जीवे मारण्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.
रुचिता नाईक ही महिला असुन तीने समाजकारण करत राजकारणात मोठे नाव केले असल्याने आपण पुरूष असुन आपले कार्य समाजात नाव का होत नाही याचा राग आल्याने हा कट रचण्यात आला आहे. रूचिता नाईक यांचे नाव दिवसेंदिवस वाढत आहे त्यांना राजकारणात सहभागी होण्यापासुन परावृत्त करणे, बदनाम करणे, शांत करणे, या उद्देशाने खोटे गुन्हे या कोबनाक याने केले आहे. रूचिता नाईक यांचे समाजात दिवसेंदिवस नाव वाढत आहे यांना कुठे तरी थांबवले पाहिजे असे हा जवळच्या लोकांना बोलुन दाखवत असे.
माझ्यावर ज्या पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करून राजकीय जीवनातुन संपविण्याचे कटकारस्थान आखले गेले हे पाहून आगामी काळात राजकारण हे क्षेत्र निवडावे की नाही असा मोठा प्रश्न पडला आहे. भविष्यात अशा घाणेरड्या राजकारणात सामान्य कुटुंबातील महिला येणार नाहीत.असे प्रतिपादन रूचिता नाईक यांनी केले.
No comments:
Post a Comment