कॉ. अमृतराव महाजन यांचा यशस्वी पाठपुरावा !!
चोपडा, बातमीदार.. तालुक्यातील घोडगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या पूर्वेकडील जागेवर वीस पंचवीस शेतमजूर झोपड्या बांधून राहतात.. त्याची घरे झोपड्या जेथे आहेत तेथेच त्यांना घरकुले बांधून द्या या मागणीसाठी गेल्या दहा वर्षापासून लाल बावटा शेतमजूर युनियन चे राष्ट्रीय कमिटी मेंबर कॉ. अमृतराव महाजन यांचे नेतृत्वात पाठपुरावा सुरू केला होता. गेल्या एप्रिल मध्ये ग्रामपंचायतवर मोर्चाही काढला होता.
त्यावेळी ग्रामपंचायत मध्ये सरपंच इंदुबाई शामराव भील, उपसरपंच संतोष कोळी, व सभासदांनी या शेतमजुरांची बाजू उचलून धरली. ग्रामसेवक श्री एस. एस. सोनवणे यांनी जिल्हा परिषद ला प्रामाणिक पणे पाठपुरावा केला. परिणामी शेतमजूर राहत असलेल्या जागेवरच प्रधानमंत्री आवास योजनेचे १५ घरकुले मंजूर झाली. घोडगाव गावामध्ये तीस वर्षापासून भारतीय कम्युनिस्ट पक्ष शेतमजूर संघटना आयटक चे कार्य सुरू असून बऱ्यापैकी आर्थिक सक्रिय पाठिंबा आहे. त्यातच घरकुले चा लढा यशस्वी झाल्यामुळे पक्ष संघटना चा पाया मजबूत होण्यास मदत होणार आहे.. कॉम्रेड विश्वास पाटील, बाळू कोळी, इरफान मण्यार ,रेखाबाई पाटील, समाधान कोळी, फुल्सिंग बारेला, सूनिल बारेला, ईश्वर महादू कोळी ,नानाभाऊ पाटील, उषाबाई भील आदींनी लढ्यात सहभाग दिला. असे लाल बावटा शेत मजूर युनियन ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.


No comments:
Post a Comment