मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर ) :
मान.माजी केंद्रीय मंत्री व रायगड, रत्नागिरी शिवसेना नेते श्री.अनंत गीते यांच्या संकल्पनेतून तसेच दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख श्री. संजय कदम आणि दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख श्री. अनिल नवगणे यांच्या मार्गदर्शनानुसार श्री. नागेंद्र राठोड महाड तालुका संपर्कप्रमुख व श्री. चंद्रकांत धोंडगे सहसंपर्क प्रमुख महाड विधानसभा यांच्या विशेष सहकार्याने निराधार गरजू व्यक्तींसाठी छोटीसे सहकार्य म्हणून दिवाळी निमित्त ११०० परिवाराना फराळाचे साहित्य महाड तालुक्यात देण्यात आले.
यावेळी चंद्रकांत धोंडगे महाड विधानसभा सह संपर्कप्रमुख, नागेंद्र राठोड महाड तालुका संपर्क प्रमुख, प्रफुल्ल धोंडगे महाड तालुका युवासेना अधिकारी, प्रशांत राजेमहाडीक महाड तालुका प्रमुख, महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना, सौ. वर्षा मंगेश कालप (महिला सरपंच -वसाप ग्रामपंचायत), मंगेश कालप, बाळकृष्ण गणपत आंबेडे, सुनील भानत ,लक्ष्मण दवंडे, जमीर देशमुख युवा नेतृत्व, मेहबूब झटाप खाडीपट्टा उपविभाग प्रमुख, कल्पेश सुतार व शिवसैनिक हे उपस्थित होते.


No comments:
Post a Comment