Tuesday, 25 October 2022

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथील आदिवासी बांधव आणि पोलीस जवानांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली दिवाळी साजरी !

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथील आदिवासी बांधव आणि पोलीस जवानांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली दिवाळी साजरी !


गडचिरोली, अखलाख देशमुख, दि २५ : गडचिरोली जिल्ह्यात काम करणारे पोलीस हे आपल्या कुटुंबापासून दूर राहून आपले कर्तव्य बजावत असतात. आजच्या दिवशी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केली. येथील जवान अतिशय चोखपणे आपले कर्तव्य बजावत असून नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याचे मत ही मुख्यमंत्री यांनी यासमयी व्यक्त केले. 

याप्रसंगी पोलीस जवानांचे कुटुंबीय आणि स्थानिक आदिवासी बांधवांना फराळ आणि भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच आदिवासी बांधवांनी सादर केलेल्या पारंपरिक कार्यक्रमांचा आनंद घेतला. 

राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल हे देखील याप्रसंगी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कोकणचे सुपुत्र मोहन कदम, श्रीराम वैद्य, दीपक फणसळकर, शांताराम गुडेकर, केतन भोज "कोकण रत्न- २०२५ मानद पदवी पुरस्काराने सन्मानित !!

कोकणचे सुपुत्र मोहन कदम, श्रीराम वैद्य, दीपक फणसळकर, शांताराम गुडेकर, केतन भोज "कोकण रत्न- २०२५ मानद पदवी पुरस्काराने सन्मानित !! ...