🔶आधारची सामाजिक दिवाळी... वंचितांच्या समवेत...
आधार फाउंडेशन, संगमनेर ने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकी जपत संगमनेर परिसरातील २५० गरजू कुटुंबांची दिवाळी गोड केली.
संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली, पारेगाव व वेल्हाळे येथील गरजू कुटुंब ,धांदरफळ बुद्रुक व जवळे कडलग येथील चर खोदाईचे काम करणारे मजूर, सोनूशी व नान्नज परिसरातील श्रमिक कुटुंब अशा २५० गरजू कुटुंबांना फराळ व साडी आधार कडून भेट म्हणून देण्यात आली. विशेष म्हणजे हे फराळ आधार टीमने स्वतः तयार केले. यासाठी अनेक दात्यांनी आर्थिक योगदान दिले तर काहींनी नव्या कोऱ्या साड्या दिल्या.
तसेच सेवाश्रम या वृद्धाश्रमामध्ये मिठाई व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या सर्व मदतीसाठी आधार फाउंडेशन च्या सर्व शिलेदारांनी परिश्रम घेतले...
आधार_फाऊंडेशन
दहा_रुपयाची_किमया
मो क्र 9422332572,
99708 66271

No comments:
Post a Comment