"श्री दिलीप नारायण कातकर " परिवर्तनाचे शिलेदार" या सन्मानाने सन्मानित"
मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
बळी प्रतिपदेच्या मुहूर्तावर कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न कुणबी युवा मुंबई आयोजित बळी पहाट- २०२२ विलेपार्ले पूर्व येथील प्रसिद्ध मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे समाजातील अनेक मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमात कुणबी ओबीसी समाजामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या समाज बांधवांना सन्मानित करण्यात येते. या वर्षी या सन्मानासाठी विक्रोळी- घाटकोपर कुणबी युवाचे अध्यक्ष श्री. दिलीप नारायण कातकर याना "परिवर्तनाचे शिलेदार' या सन्मानाने मान्यवर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या समाज रत्नाचा गौरव हा संपूर्ण कुणबी युवा विक्रोळी- घाटकोपरचा गौरव आहे. त्याबद्दल कुणबी युवा मुंबईचे शाखा पदाधिकारी, सदस्य आणि सभासद शतशः आभारी आहोत. त्याच बरोबर या गौरवमुर्तीकडून अजून समाज हिताचे उपक्रम राबवून व समाज शाखेतील यूवकांना समाजाप्रती आपुलकी निर्माण होवो या साठी त्यांना यश लाभो व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. श्री. मनिष केशव वालम प्रचारक- कुणबी युवा विक्रोळी- घाटकोपर यांनी त्यांचे विशेष कौतुक करत अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:
Post a Comment