नाट्यलेखक यशवंत माणके लिखित/ दिग्दर्शित "हा खेळ भावनांचा" ह्या नाट्यप्रयोगाचे आयोजन !
मुंबई - ( दिपक कारकर )
कोकण भूमिपुत्र आणि आजवर नाट्यक्षेत्रात नाट्यलेखक/ दिग्दर्शक म्हणून अलौकिक असणाऱ्या यशवंत माणके यांच्या लेखणीतून व दमदार अभिनयातून साकारलेल्या आतापर्यंत सगळ्याच नाट्य प्रयोगांना मिळालेल्या उस्फूर्त प्रतिसादानंतर पुन्हा एकदा आपल्या सेवेसाठी तेवढ्याच उर्जेने आपल्या भेटीला घेऊन येतं आहोत "हा खेळ भावनांचा" जन्म आणि मृत्यु याच्या मधला प्रवास म्हणजे आयुष्य, या प्रवासात वाट्याला आलेले सुखदुःखाचे अनुभव हे प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रारब्ध, मरणानंतर कुणाच काय होत? कोण कुठे जातो हे प्रत्येकाने रचलेले आपल्या प्रगल्प विचारांचे मनोरे आहेत. त्यापैकि "हा खेळ भावनांचा" जिवंत असताना मुक्तपणे उधळलेला आनंद, मरणानंतर उपभोगत असतील का? कायम दुश्मनी असलेले ते पुन्हा एकमेकांचा सूड घेतील का? आयुष्यभर त्याच्या वाईटावर उठलेला त्याला जवळ करत असेल का? कसं असेल त्यांचं जग? आधीसारख आताही ते एकत्र असतील का? त्यांचीही एक संस्था असेल का? जगायचं राहून गेलं याचा त्यांना पश्याताप होत असेल का? प्रश्न अनेक पण उत्तर एकच "हा खेळ भावनांचा" चांगल्या वाईटाची आणि सुखदुःखाची गोळा बेरीज ही भावनेवर अवलंबुन असते.
रसिक हो, 'मरणानंतर भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या पण अर्थ उरला शून्य...'
एका अतृप्त आत्म्याच्या भावनेवर आधारित विनोदी अंगाने नटलेली पण शेवटाला काळजाला हात घालणारी दोन अंकी कलाकृती "हा खेळ भावनांचा" अर्चना थिएटर निर्मित,नवनिर्माण कलामंच, प्रस्तुत रविवार दि.३० ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० : ३० वा.छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, दादर ( प. ) येथील नाट्यगृहात सादर होणार आहे. ह्या नाटकाचे शीर्षक गीत सुनिल मते लिखित तर गायक/शाहीर रविंद्र भेरे यांच्या सुमधुर आवाजातून ऐकायला मिळेल. नाट्यलेखक यशवंत माणके यांनी बोलताना सांगितले की, माझ्या आगळ्या वेगळ्या विषयाला, आधीच्या नाटकाप्रमाणे जवळ कराल, प्रेम द्याल, हीच मनिषा ठेवत सर्वजण मोठ्या संख्यने उपस्थित रहा. अधिक माहितीसाठी यशवंत माणके - ९८१९८७५६४८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment