Thursday, 27 October 2022

मेहरुण तलाव वाहून जाणारे पाणी महापौर यांनी यंत्रणेकडून रोखले !

मेहरुण तलाव वाहून जाणारे पाणी महापौर यांनी यंत्रणेकडून रोखले !


जळगाव दि २७ : ओसांड भिंतीजवळील माती वाहून गेल्याने सांडव्यातून मेहरुण तलावातील वाहून जात असलेले पाणी तत्काळ रोखण्याच्या सूचना प्रथम नागरिक व महापौर तसेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या संचालिका तथा जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ञ संचालिका सौ. जयश्री सुनिल महाजन यांनी दिल्यानंतर मनपा प्रशासनाने बुधवार, दि. २६ ऑक्टोबर २०२२ रोजी या कामाला सुरुवात केली. आज गुरुवार, दि.२७ ऑक्टोबर २०२२ रोजी जेसीबीच्या साह्याने पुन्हा काम सुरू केले. माती, दगड, विटा तसेच सिमेंटचा वापर करून तलावाबाहेर जाणारे पाणी पूर्णपणे थांबविण्यात आले.भविष्यात ही समस्या पुन्हा निर्माण होऊ नये, म्हणून तलाव ओसांड भिंतीच्या रुंदीकरण करण्याच्या कामाचे त्वरित नियोजन करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना महापौर सौ. महाजन यांनी केल्या.

सांडवाची माती वाहून गेल्याने मेहरूण तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणातुन बाहेर पडत होते.यासदर्भात पर्यावरणप्रेमी नागरिकांनी महापौर यांच्याकडे हा विषय बुधवारी मांडून लक्ष वेधले.यातक्रारीची गंभीर दखल घेत महापौर सौ.महाजन यांनी मनपा प्रशासन ला तातडीने मेहरुण तलावातील पाणी रोखण्याच्या सूचना दिल्या. बुधवारी सायंकाळीच जेसेबी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने मेहरुण तलाव परिसरातील ओसांड भिंतीजवळ कामाला सुरुवात करण्यात आली. मातीने बंधारा करून पाणी अडविण्याचा प्रयास झाला. पुन्हा गुरुवारी याठिकाणी मनपा यंत्रणेकडून कामाला सुरुवात झाली. माती, दगड, सिमेंट इत्यादी चा वापर करून पाण्याचा होत पडलेला निचरा पूर्णपणे बंद करण्यात आला. महापौर सौ.जयश्री महाजन यांनी आज मेहरुण तलाव ला भेट देऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच कर्मचाऱ्यांना सूचनाही केल्या. सांडवा जवळ मातीचा भरणा टाकल्याने तलावातील पाणी आता सुरक्षित राहण्यास मोठी मदत झाली आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...