Tuesday, 1 November 2022

सामंत ट्रस्ट तर्फे गरजूंना आर्थिक मदत !

सामंत ट्रस्ट तर्फे गरजूंना आर्थिक मदत !


मुंबई, (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे सावंतवाडी तालुक्यातील गरजू रुग्णांना तसेच होतकरू विद्यार्थ्यांना आज धनादेश प्रदान करण्यात आले.

इन्सुली येथील प्रियांका पोपकर या कॅन्सरग्रस्त महिला रूग्ण, सोनुर्ली येथील गंभीर अपघातामुळे दिव्यांग विद्यार्थी तन्मय गावकर या दोघांना प्रत्येकी दहा हजार रुपये तसेच बांदा येथील नाबर स्कूल मधील इयत्ता नववीच्या वर्गातील होतकरू विद्यार्थी प्रभाकर परब याच्या थकीत फी साठी आर्थिक मदत म्हणून त्याच्या विधवा निराधार आईला (सुरेखा परब) तेरा हजार आठशे रुपयांचा धनादेश डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी इन्सुलीचे सामाजिक कार्यकर्ते नाना पेडणेकर आणि आमडोसकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !!

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !! मुंबई (शांताराम गुडेकर) :         ...