Monday 28 November 2022

लोहमार्ग पोलीसांना झालेतरी काय? आधी चरस विक्री, आता गुटख्यामध्ये हफ्ता, ऐसीबीचा मस्त दस्ता !

लोहमार्ग पोलीसांना झालेतरी काय? आधी चरस विक्री, आता गुटख्यामध्ये हफ्ता, ऐसीबीचा मस्त दस्ता !

कल्याण, (संजय कांबळे) : पुढच्यास ठेस मागचा शहाणा, अशी मराठीत म्हण आहे, परंतु हे मुंबई लोहमार्ग पोलीसाना माहिती नाही की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे,ते आज घडलेल्या पालघर लोहमार्ग पोलीसांच्या हफ्तेखोरी मुळे ?

याबाबत सविस्तर वृत असे की, मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयातंर्गत पालघर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या पोलीस नाईक अकील जमाल पठाण वय ३२ वर्षे आणि त्यांचा सहकारी पोलीस शिपाई समाधान शेषराव नरवडे यांनी आज महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा वाहतूक करताना एका ३७ वर्षीय पुरुषाला पकडले, यामध्ये कारवाई करु नये म्हणून व यापुढे धंदा सुरु ठेवण्यासाठी दरमहा १० हजार रुपये देण्याची मागणी केली, यातील पहिला १० हजाराचा हफ्ता स्विकारताना डहाणू रेल्वे स्थानक येथे ऐसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

ऐसीबीच्या या सापळ्यात नवनाथ जगताप, उप अधीक्षक, स्वपन बिश्वास, पोलीस निरिक्षक, पोहवा, अमित चव्हाण, विलास भोये, नितीन पागधरे, निशा मांजरेकर, दिपक समुडा, नवनाथ भगत, पोना,सखाराम दोडे, स्वाती तरवी यांनी पोलीस अधीक्षक, सुनील लोंखडे, ऐसीबी ठाणे परिक्षेत्र, अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक, ऐसीबी ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई केली,

विशेष बाब म्हणजे काहीच दिवसापूर्वी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पैलीसांना "चरस" हा अंमलीपदार्थ विक्री करताना पकडले, त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, तर यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेट्रल, दादर, कुर्ला, ब्रांदा, कल्याण आदी स्टेशनवर सोने व्यापारी, चरस, गांजा, गुटखा, आदी बाबतीत जबरी वसुली केल्यामुळे अनेक लोहमार्ग पोलीसावर कारवाई केली आहे, परंतू तरीही यातील भ्रष्टाचार, वसुली कमी होत नाही, हे वरीष्ठांना माहिती नाही असे नाही की ते जाणीवपुर्वक याकडे दुर्लक्ष करतात असा संशय निर्माण होतो.

डाँ,प्रज्ञा सरवदे, पोलीस महासंचालक, लोहमार्ग मुंबई या अंत्यंत कर्तव्यनिष्ठ आहेत, त्यांचा जबरदस्त धाक आहे, त्यांनी आतापर्यत अनेकावर कडक कारवाई केली आहे, तरीही असे प्रकार वांरवार कसे घडतात? हा खरा प्रश्न आहे,अशा बेकाबू,भ्रष्ट पोलीसामुळे संपूर्ण लोहमार्ग पोलीसांची प्रतिमा मलिन होत आहे, हे वेळीच रोखायला हवे.

आजही वरील टर्मिनस वर वरीष्ठाचे आदेश/ सूचना डावलून बँग चेकिंगच्या गोडस नावाखाली जबरन वसूली सुरु असल्याचे खात्रीलायक वृत आहे‌.

मुंबई चे लोन आता थेट पालघर पर्यत पोहचल्याचे आजच्या ऐसीबीच्या कारवाई वरुन स्पष्ट होते, त्यामुळे हे रोखायचे असल्यास स्वत: अप्पर पोलीस महासंचालक डाँ प्रज्ञा सरवदे मँडम यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत एका सामाजिक कार्यकर्त्याने व्यक्त केले.

2 comments:

  1. खास करून पोलीस भरती चे वेळेस किंवा कोणत्याही सरकारी भरती चे वेळेस नीतिमत्ता, स्वभाव तपासणे (नुसते फॉर्मॅलिटी म्हणून नव्हे) गरजेचे आहे असे वैयक्तिक मत आहे. ज्यामुळे जबाबदारी चे पोस्ट मध्ये जबाबदार आणि योग्य निर्णय घेऊ शकणारे च कर्तव्यनिष्ठ कर्मचारी भरले जातील.. पण कोणाची सध्याची मानसिकता वारंवार अचूक मूल्यमापन करू शकणारी यंत्रणा अस्तित्वात नाही..एवढा भ्रष्टाचार होऊनही शेवटी अत्यावश्यक सेवा आणि लोकांचे सहानुभूती मिळवून असे काही भ्रष्ट कर्मचारी हे इतर चांगल्या कर्तव्य निष्ठ कर्मचाऱ्यांचे बाळावर स्वतःची पोळी इमेज शेकून घेताना दिसून येतात.. पण कर्तव्यनिष्ठ पाहिजे तरी आहे का कुणाला हा ही एक प्रश्न??. तसेच सरकारी नोकरीत बडतर्फ निलंबित होणे म्हणजे काय असते??. काही वर्ष अर्धा पगार किंवा 25% पगार नंतर आऊ, दादा, भाऊ, काका, मामा ह्यांचे मदतीने केस रफा तफा करून पुन्हा कुठे तरी नोकरी वर रुजू करून घेणे.. कर्तव्यनिष्ठ कर्मचारी अशा ठिकाणी हतबल असतात.. सर्वांनाच सोबत घेऊन विकास करावा असे आपले व्यवस्था आहे.. *"एक मेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ.."* ही म्हण योग्य ठरते..

    ReplyDelete
  2. वेतन साठी हे नोकरी करतच नाही वरकमाई साठीच सर्वाना सरकारी नोकरी पाहिजे हेच समाजात ठाम विश्वास आहे देश सेवा साठी हे अंधविश्वास आहे

    ReplyDelete

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...