*अल्पसंख्याक शिष्यवृत्ती बहाल करा - आप 'पालक संघटना*
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १ : केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालय आणि समाज कल्याण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यादेश काढून अल्पसंख्याक समाजातील म्हणजेच मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी आणि जैन या समाजातील पहिली ते आठवीपर्यंत शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची अल्पसंख्या संवर्गातील शिष्यवृत्ती अचानकपणे 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून रद्द करण्याचा निर्णय निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. हा निर्णय अन्यायकारक असून याचा परिणाम अल्पसंख्याक समाजातील आर्थिक दुर्बल असलेल्या मुलांच्या शैक्षणिक भविष्यावर पडणार आहे , आधीच 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना बंद करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयामुळे गरीब समाजातील मुले शिक्षणापासून वंचित होण्याच्या कागारावर पडलें आहेत आणि आता शिष्यवृत्ती बंद चा निर्णय, दोन्ही निर्णय दुर्भाग्यपूर्ण असून, केंद्र शासनाने सदर निर्णय तत्काळ रद्द करून उलट अल्पसंख्याक समाजातील शिष्यवृत्ती वाढवून देण्याची गरज आहे, असे आम आदमी पालक संघटनाच्या वतीने आज दिलेल्या केंद्रीय समाज कल्याण मंत्री आणि केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटलं आहे.
आम आदमी पालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष इसाक अंडेवाला, प्रदेश अध्यक्ष अशिर जयहिंद यांनी तीव्र निषेध नोंदवला, विशेष उपस्थिती म्हणून आपचे नेते जालिंदर ढाकणे, जिल्हा महिला अध्यक्ष मेघा रायकर, ज्योती जाधव, शहर अध्यक्ष रूपाली धनेधर, श्रीमती ताज खान, मजास खान , प्रशांत निकम, ज्ञानेश्वर बोरसे, सोहेल खान, शेख जाकीर, शेख हबीब, शेख मुस्ताक , अब्दुल हाई, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment