नववर्षाच्या स्वागतला रंगणार आशिष भाई तिवारी चषकाचा थरार !
मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर) :
समस्त क्रीडाप्रेमी ज्या चषकाची आतुरतेने वाट पाहत असतात तो चषक अर्थात एस.पी ग्रुप आयोजित आशिष भाई तिवारी चषक-२०२३ नववर्षाच्या आगमनाला शनिवार दिनांक ७ व रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी ६ वा मजला, हायस्ट्रीट मॉल, माजिवडा, ठाणे येथे संपन्न होत आहे. नेहमी नवनवीन संकल्पना घेऊन येत राहणे आणि त्या यशस्वी करून दाखवणे हेच एस.पी ग्रुपचे वैशिष्ट राहिले आहे. सन २०२३ मध्ये आज पर्यंत महाराष्ट्र अंडर आर्म क्रिकेटच्या इतिहासात कधीही न झालेली क्रीडा स्पर्धा होतेय. महिला खेळाडूंना मुख्य प्रवाहात आणून त्यांना पुरुष खेळाडूं सोबत एकत्र खेळविण्यात येणार आहे. नामांकित १२ संघ मालक रोहित नायर (आर.सी.सी ), तनय महाले (ग्लाडिएटर), निलेश पालवणकर (वीर मराठा), अमरकांत जैन (सर्वश्रेष्ट), मीनल चोप्रा- अक्षय घाडी (सेन्चुरिअन), राहुल महाडिक (के.सी.आर २), सचिन चव्हाण (डी. एम स्पोर्ट्स), रंजित पाटील (विघ्नेश ११), डॉ.कृती बाठीया (जॉय ११) ,अनिता परमार राज गोल्लर (ए.आर सुपरस्टायकर ), संगीता जाधव, समीर मांजरेकर (एस एस स्मशर्स ), मिलिंद मोरे (पारसिक चॅम्पिअन्स) तब्बल १९६ खेळाडूंवर बोली लावण्यात उत्सुक असून खेळाडूंची लिलाव प्रकिया (ऑक्शन ) गुरुवार दिनांक १५ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४-३० वाजता सुप्रसिद्ध अशा आय.लीफ बॅंकविट्स, ठाणे येथे होणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, जिलेण्ड खेळाडूं, कलाकार स्पर्धेला भेट देणार असून विजेत्या संघाला-३१०००/- व मानाचा चषक तर उपविजेत्या संघाला-२१०००/- व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. समस्त खेळाडूं प्रेक्षक यांच्यासाठी भोजनासह, आकर्षक लकी ड्रॉ ठेवण्यात आला असल्याचे मंडळाचे सचिव श्री. विनायक कदम यांनी कळविले आहे. अंडर आर्म बॉक्स क्रिकेट (UBC) यु ट्यूब चॅनेल वरून सदर स्पर्धा प्रसारित होणार आहे. सदर स्पर्धेचे माध्यम प्रायोजक दै. अग्रलेख (संपादक श्री. उमेश भेरे) आहे.
No comments:
Post a Comment