"एक दिवस माझ्या बळीराजासाठी" उपक्रमाअंतर्गत कृषी अधिकाऱ्यांनी साधला वेळंब येथील शेतकऱ्यांशी संवाद !
[कोकण / गुहागर : उदय दणदणे]
दिनांक: ०२/१२/२०२२
शेतकऱ्यांच्या व्यथा समस्या जाणून घेण्यासाठी शासनाच्या वतीने "एक दिवस माझ्या बळीराजासाठी" हा महत्वपूर्ण उपक्रम शासनाच्या वतीने सर्वत्र राबविण्यात येत आहे.
सदर उपक्रमाअंतर्गत शुक्रवार दि. ०२ डिसेंबर २०२२ रोजी गुहागर तालुक्यातील वेळंब ग्रामपंचायत कार्यलयामध्ये तालुका कृषी विभागाच्या माध्यमातुन "एक दिवस माझ्या बळीराजासाठी " या उपक्रमाच्या माध्यमातून शेतक-यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी राजेंद्र माने -(उपविभागीय कृषि अधिकारी, चिपळूण) यांनी गुहागर भेटी दरम्यान वेळंब येथील शेतकऱ्यांशी सवांद साधला.
सदर भेटी दरम्यान शेतकरी संदिप गुरव, संजय गुरव, मेघश्याम गुरव, गोपाळ मोरे, परशुराम निर्मळ, विजय माळी, यांच्या कलिंगड लागवड, कुळीथ लागवड , तसेच फळ- पालेभाजी लागवड प्रक्षेत्रास भेट देऊन कृषी प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन कार्यक्रम राबवून कृषी उत्पन्न दुप्पट करण्याविषयी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत शेतकऱ्यांच्या समस्या व्यथा जाणून घेतल्या व शेतकऱ्यांच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी कृषी विभाग कटिबद्ध असल्याचे सांगितले.
सदर भेटी प्रसंगी गुहागर तालुका कृषी अधिकारी- अमोल क्षीरसागर तसेच बी.एस. कोळी - मंडळ -कृषी अधिकारी, व कृषी पर्यवेक्षक - प्रभाकर जाबरे, व पी.एम. गवारी, कृषी सहाय्यक- ए.एस शेळके, राहुल दराखा, कृषि पर्यवेक्षक- श्री. संदीप गवंड (संगमेश्वर निवे) आणि अमित शेळके तसेच सरपंच - समिक्षा बारगोडे व उपसरपंच - श्रीकांत मोरे व ग्रा. सदस्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment