Tuesday, 27 December 2022

असंघटित श्रमिकांना कौशल्य विकास योजना लाभदायक – विरजेशजी उपाध्याय !

असंघटित श्रमिकांना कौशल्य विकास योजना लाभदायक – विरजेशजी उपाध्याय !

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास मंडळ, भारत सरकार यांच्या मुंबई विभागाच्या वतीने गोर्‍हे (वाडा, जि. पालघर) येथे गोवर्धन कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने लघुकालिन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून बोर्डाचे चेअरमन विरजेशजी उपाध्याय उपस्थित होते. 
यावेळी श्रमिकांना संघटित करणे, त्यांना विविध प्रकारच्या शासकीय योजना, केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना, बचत गट, स्वयंरोजगाराच्या कल्याणकारी योजना, बचत गट व स्वयंरोजगार व्यवसाय व उद्योगधंदा, आर्थिक साक्षरता आदी विषयांवर मार्गदर्शन कऱण्यात आले. याप्रसंगी सरपंच हर्षला पडावळे, प्रा. आनंद गोसावी, अजित कृष्णा दास, विनायक जोगळेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय संचालक चंद्रसेन जगताप यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेंद्र घारपुरे, भूषण पवार यांनी परिश्रम घेतले. योगेश चारी, विठ्ठल नारागुडे, सुनिल प्रभू, मु. जो. गलतरे आदींनीही यावेळी मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...