Sunday 1 January 2023

कलगी तुरा समाज उन्नति मंडळ आयोजित गौरी गणेश नृत्य स्पर्धा व दिनदर्शिका २०२३ प्रकाशन सोहळा महाड -बेबलघर येथे मोठ्या उत्साहात संपन्न !

कलगी तुरा समाज उन्नति मंडळ आयोजित गौरी गणेश नृत्य स्पर्धा व दिनदर्शिका २०२३ प्रकाशन सोहळा महाड -बेबलघर येथे मोठ्या उत्साहात संपन्न !

[ कोकण - उदय दणदणे ]

कोकणातील अनेक लोककला आज लोप पावत चालल्या असताना कोकणातील कलगी तुरा ( जाखडीनृत्य ) लोककलेची बदलत्या काळानुसार लोकप्रियता कायम आहे आणि ती अबाधित ठेवण्यासाठी कलेच्या प्रवाहातील  गौरवशाली परंपरा असणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था कलगी तुरा समाज उन्नती मंडळ (मुबंई) ही संस्था अभिमानास्पद कार्यरत असून जाखडी नृत्य (कलगी -तुरा) लोककलेचं संवर्धन होण्याबरोबरच कलाकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात.
       नुकतीच गुरुवार दिनांक.२९ डिसेंबर२०२२ रोजी रायगड जिल्ह्यात महाड बेबलघर येथे गौरी गणेश (जाखडी नृत्य ) स्पर्धा-२०२२-२३ व दिनदर्शिका-२०२३ चे प्रकाशन आणि युवा-जेष्ठ शाहीर गुणगौरव सोहळा- २०२२, कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक: प्रमोद गांधी- (उद्योजक) रघुनाथ भागवत- (पत्रकार) अभयदादा सहस्रबुद्धे समन्वय समिती अध्यक्ष, चंद्रकांत गोताड उपाध्यक्ष, सुधाकर मास्कर सचिव, कैलासदादा धाडवे समाजसेवक, जतीन मोरे, अमित चिबडे, जयवंत चिबडे, भारदेगुरूजी, वैभव पवार, पडवल गुरूजी, अनंत तांबे, संदेश पवार अशा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
         सदर भव्य दिव्य स्पर्धा कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व शिव-पार्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. तद्नंतर
प्रमोदजी गांधी (उद्योजक) पत्रकार -रघुनाथ भागवत, अभयदादा सहस्त्रबुद्धे समन्व्य समिती अध्यक्ष, कैलास दादा धाडवे अमित चिबडे, जतीन मोहन गोरे, जयंत चिबडे, चंद्रकांत गोताड,भारदे गुरुजी, अध्यक्ष अंतजी तांबे सरचिटणीस संतोष धारशे, खजिनदार सत्यवान यादव, चिटणीस सुधाकर मास्कर, चंद्रकांत धोपट, वैभव पवार, यांच्या उपस्थित आणि जेष्ठ शाहीर यांच्या शुभहस्ते स्पर्धा रिंगणाचे श्रीफळ वाढऊन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. 
         सहभागी स्पर्धकांचे प्रमुख पाहुणे, उद्घाटक -प्रमोद गांधी यांच्या शुभहस्ते चिठ्ठ्या उडवून स्पर्धकांना सादरीकरण क्रम देऊन तसेच पंच स्थान व त्यांची कामगिरी निश्चित करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. स्पर्धेचे पंच परीक्षक होते...

सरपंच -अनंत तांबे -अध्यक्ष 
संतोष धारशे- सरचिटणीस , 
कविता विभाग पंच- भारदे गुरुजी, मधुकर यादव, निलेश जोगळे 
रंगबाजी पंच- सुरेश ऐनारकर, दिलीप नामे, प्रकाश पांजणे,
रंगबाजी पंच- अशोक पाटील,झराजी वीर, कृष्णा जोगळे  नृत्य विभाग पंच- चंद्रकांत गोताड, आप्पा फडकले, अनंत येलमकर निवेदक- संतोष धारशे ,सुधाकर मास्कर यांच्या पारदर्शक कृतीतून पहाटे पर्यंत चाललेल्या या स्पर्धेची कामगिरी पंचांनी चोख बजावून लक्षवेधी ठरलेल्या या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
       *प्रथम क्र.* बक्षीस रोख रुपये ११,१११ /- सन्मान पत्र, सन्मानचिन्ह, ढोलकी विजेते- *भैरवनाथ  नृत्य  कला पथक* तुळशी ता.मंडणगड, *द्वितीय क्र.* बक्षीस रोख रुपये ५,५५५ /-  सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, ढोलकी  विजेते- *कुलस्वामिनी नृत्य कला पथक* मु.सव, महाड, *तृतीय क्र.* बक्षीस रोख रुपये ३,३३३ /-  ढोलकी सन्मानपत्र, सन्मानचिन्ह विजेते- *श्री.कालभैरव जोगेश्वरी कला पथक* वडघर ता.माणगाव, तसेच *उत्कृष्ट ढोलकीपट्टू विजेते* पारितोषिक - सौरभ संतोष पोस्टुरे -सन्मानपत्र, ढोलकी,  *उत्कृष्ट गायक* -शाहीर रोहित श्रीधर घाग -सन्मानपत्र,करा ओके माईक, शिवाय सहभागी कलापथक संघाना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि ढोलकी मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच सदर सोहळ्याप्रसंगी अनेक *वरीष्ठ/ युवा कलाकार शाहिरांचा* संस्थेच्या वतीने शाल सन्मानचिन्ह,सन्मानपत्र, देऊन गौरविण्यात आले. त्यात प्रामुख्याने उपस्थित - महादेव भाने, विश्वास बटावले, शांताराम भेकत, मारुती मौले, अनंत मांडवकर, अनंत केंद्रे, सुभाष रामा तांबे, सखाराम माळी, नथुराम शिंदे, दिपक कदम, गंगाधर जाधव, महादेव गोठल, गुरुदास चिबडे, श्रीराम पातेरे, दामोदर नामोले, उदय काटकर ,
उदय चिबडे, श्रीरंग रहाटवल, संतोष  यादव,अशा उल्लेखनीय  कार्यरत असणाऱ्या शाहिरांचा सत्कार करण्यात आला.
सदर भव्य दिव्य स्पर्धा कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन* सरचिटणीस- संतोष धारशे, मिलिंद चिबडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष- अनंत तांबे सरचिटणी- संतोष धारशे, खजिनदार -सत्यवान यादव, चिटणीस- सुधाकर मास्कर, उपाध्यक्ष- सुरेश चिबडे, उपाध्यक्ष- सुरेश ऐनारकर, वादविवाद समिती उपाध्यक्ष- चंद्रकांत धोपट, उदय चिबडे, निलेश जोगळे, दिपक महादे ,अनंत मुंगले, निलेश मोगरे, श्रणव यादव, जगदीश  ठोंबरे, नामदेव गोरीवले, अनिल  चिबडे, मंगेश पौलेकर, अविनाश म्हसकर, रघुनाथ चिबडे, अनिल गोठल, शैलेश धोंडगे, गणेश चिबडे, मिलिंद चिबडे (बेबलघर पोलीस पाटील ) सर्व विकास मंडळ बेबलघर, मुंबई मंडळ, तरुण मंडळ व महिला मंडळ, तसेच कलगी तुरा समाज उन्नती मंडळ (मुंबई ) सर्व पदाधिकारी यांच्या अथक  प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...