नववर्षाची सुरुवात मानाच्या स्पर्धेने ..आशिष भाई तिवारी चषकाने.!
मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर )
समस्त क्रीडाप्रेमी ज्या चषकाची आतुरतेने वाट पाहत असतात तो चषक अर्थात एस पी ग्रुप आयोजित आशिष भाई तिवारी चषक- २०२३ नववर्षाच्या आगमनाला शनिवार दिनांक ७ व रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी हायस्ट्रीट मॉल,ठाणे येथे होणार आहे. नेहमी नवनवीन सकल्पना घेऊन येत राहणे आणि त्या यशस्वी करून दाखवणे हेच एस पी ग्रुपचे वैशिष्ट्य राहिले आहे. सन २०२३ मध्ये आज पर्यंत महाराष्ट्र अंडर आर्म क्रिकेटच्या इतिहासात कधीही न झालेली क्रीडा स्पर्धा होणार आहे.महिला खेळाडूंना मुख्य प्रवाहात आणून त्यांना पुरुष खेळाडूं सोबत एकत्र खेळविण्यात येणार आहे. त्यासाठी १४४ खेळाडूंचा ऑक्शन सोहळा सुप्रसिद्ध अशा आय लीफ रीतझ या नामांकित बॅंक्वीट मध्ये पार पडला आहे. सदर सोहळ्या साठी लिजेण्ड क्रिकेटर अमोल म्हात्रे सर, व्यावसायिक प्रतिश आंबेकर, सिनेभिनेते संदीप जुवाटकर, अभिनेत्री मिताली साळगावकर, रुबीना वेल्डिंग वाला, किरण जाधव विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित होते. सदर स्पर्धेच्या निमित्ताने संघ मालक रोहित नायर (आर सी सी ), तनय महाले (ग्लाडिएटर ), निलेश पालवणकर (वीर मराठा ), अमरकांत जैन (सर्वश्रेष्ट), मीनल चोप्रा अक्षय घाडी(सेन्चुरिअन ) राहुल महाडिक (के सी आर 2), सचिन चव्हाण (डी. एम स्पोर्ट्स), रंजित पाटील (विघ्नेश 11), डॉ. कृती बाठीया (जॉय 11), अनिता परमार राज गोल्लर (ए आर सुपरस्टायकर ), संगीता जाधव, समीर मांजरेकर (एस एस स्मशर्स), मिलिंद मोरे (पारसिक चॅम्पिअन्स) यांचा सन्मान करण्यात आला. सन 2022 या वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. वर्षातील सर्वोत्तम खेळाडू मीनल चोप्रा / तनय महाले, सर्वोत्तम फलंदाज दिया संघवी /समीर गावडे, सर्वोत्तम गोलंदाज संगीता जाधव / अनिकेत भिलारे तर तन्वी गोर / संदेश पाटील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ठरले. विजेत्या संघाला रु.३१०००/- व मानाचा चषक तर उपविजेत्या संघाला रु.२१०००/- व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. समस्त खेळाडूं प्रेक्षक यांच्यासाठी स्पर्धेच्या दिवशी भोजनासह, आकर्षक लकी ड्रॉ ठेवण्यात आला असल्याचे मंडळाचे उपाध्यक्ष श्री. आकाश तिवारी व सचिव श्री विनायक कदम यांनी कळविले आहे. अंडर आर्म बॉक्स क्रिकेट (UBC) यु ट्यूब चॅनेल वरून सदर स्पर्धा प्रसारित होणार आहे.सदर स्पर्धेचे माध्यम प्रायोजक मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रकाशित होणारे दै अग्रलेख (संपादक उमेश मारुती भेरे )आहे.
No comments:
Post a Comment