अंगणवाडी आशा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा नागपूर विधीमंडळावर प्रचंड मोर्चा .. मुख्यमंत्र्याचे आश्वासन !
चोपडा / जळगाव.. महाराष्ट्र राज्य आयटक प्रणित ग्रामपंचायत अंगणवाडी आशा स्त्रिपरिचर कर्मचारी आदि संघटनांच्या वतिने गेल्या दि .२८ डिसेंबर २०२२ रोजी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्वात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढून धडक दिली .
आयटकशी संलग्न असलेल्या महाराष्ट्रातील अनेक कामगार संघटनांचा सुध्दा विराट मोर्चा होता . मोर्चा अभुतपुर्व होता, किमान ४० हजाराच्यावर महिला व पुरुष कर्मचारी -कामगारांची भागीदारी होती. महाराष्ट्राच्या ३५ जिल्हयातून आलेले , पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपला सहभाग नोंदवला.ग्राम पंचायत महासंघाची देखील मोर्चात उल्लेखनीय भागीदारी होती .विविध वृत्तपत्रे, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक्स मिडियासह इतर माध्यमांनी सुध्दा कष्टकरी - कामगारांच्या एकजुटीची आणि लाल बावट्याचा मोर्चा म्हणून विशेष दखल घेतली .
दुपारी साडेबारा वाजता चाचा नेहरू बालभवन, गांधी सागर ( शुक्रवारी तलाव ) नागपूर येथून निघालेला " विराट मोर्चा " जवळपास तीन किलोमीटरचे अंतर पार करत, मार्गक्रमण करीत मागण्यांच्या गगनभेदी घोषणा व नारे देत बर्डी स्थित टेकडी जवळ पोहचला . संपुर्ण मोर्चाचे नेतृत्व आयटकचे राष्ट्रीय सचिव कॉ . सुकुमार दामले राज्य सचिव शाम काळे, कॉ. त्यात मोहन शर्मा, कामगार नेते कॉ . तुकाराम भस्मे, भाकपचे राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे, आयटकचे राज्य सेक्रेटरी कॉ. शाम काळे, कॉ. राजु देसले, ग्राम पंचायत महासंघाचे अध्यक्ष प्रा .तानाजी ठोंबरे, मिलींद गणवीर, कॉ . नामदेव चव्हाण, आयटक नेते कॉ .कृष्णा भोयर,, कॉ . शंकर पुजारी, कॉ. माधुरी क्षीरसागर, आयटक राज्य उपाध्यक्ष कॉ . अमृत महाजन दिलिप उटाणे ,वंदना पाटील (जळगाव) संजय मंडवधरे आदींनी केले त्यावेळी आलेल्या प्रचंड कामगार समुदायास संबोधित केले .आयटकच्या वतीने सर्वसमावेशक असलेल्या मागण्यांचे निवेदन मोर्चाच्या शिष्टमंडळाने थेट मुख्यमंत्र्याची भेट घेऊन यावेळी 16मागण्यांचे निवेदन सादर केले .अन्य संघटनांनी निवेदन आप- आपल्या मागण्याच्या संबंधाने व्यथा निवेदनाव्दारे आणि तोंडी सांगितल्या .
महासंघाच्या वतीने सुद्धा कॉ. नामदेव चव्हाण यांच्या नेतृत्वात आपल्या विविध प्रलंबित मागण्यांचे स्वतंत्र निवेदन मा . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले . मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष झालेल्या भेटी दरम्यान आणि चर्चेप्रसंगी प्रामुख्याने मा.अभय यावलकर समितीच्या शिफारशी मान्य करुन ग्रा.पं.अंगणवाडी आशा स्त्री परिचर शालेय पोषण आहार रोजगार सेवक कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करा, २०१७ नंतर सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्त लाभ देणेसाठी मंजूर १०० कोटि रू अदा करा. ,ग्राम पंचायत कर्मचारी चा २०१७ फेब्रुवारी २०१८ ते मार्च २०२२पर्यंतची किमान वेतनाच्या वाढीव फरकाची रक्कम शासनाने दयावी , १०० टक्के वेतन अनुदान व राहणीमान भत्ता,दयावा, कालबाह्य झालेल्या लोकसंख्येचा जाचक आकृतीबंध रद्द करा अंगणवाडी सेविका व मदतनीस जाहीर करण्यात आले ली वाढ द्या जिल्हा परिषद अंतर्गत व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची रिक्त भरती करा, ग्रॅच्युईटी द्या स्त्रिपरीचर यांना मंजुर १००००₹ वेतन द्या खाजगी करणं कंत्राटी करण निती रद्द करा किमान १००००₹ पेंशन इत्यादी मागण्या करण्यात आल्या. मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी आपले प्रश्न ऐकून घेतले आणि आपल्या काही मागण्या समजून घेऊन जानेवारीचे दुसऱ्या आठवडयात संबंधित मंत्र्यासमवेत, म्हणजेच राज्याचे ग्रामविकास मंत्री मा . ना. गिरीश महाजन तसेच संबंधित खात्याच्या मंत्री, वित्त मंत्री यांचे समवेत संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करून शक्य असलेल्या मागण्या निकाली काढण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन मा मुख्यमंत्र्यांनी दिले .
आणखी योगा-योग म्हणजे आमदार अभिमन्यु पवार व आमदार बळवंत वानखडे यांनी आपल्या मोर्चाला भेट दिली .त्यांनी विधी मंडलात आवाज उठवला.
सदरच्या आश्वासनानुसार जानेवारी महिन्यात होणाऱ्या बैठकीदरम्यान आपल्या प्रलंबित मागण्याच्या अंमलबजावणीबाबत काही तरी निर्णय होऊन पदरात पडेल अशी अपेक्षा आहे. तथापि नेहमीप्रमाणे आताही मुख्यमंत्र्याकडून निराशा झाली तर, संप लढयाच्या तयारीचा निर्णय घ्यावा लागेल असाही इशारा आयटक चे सचिव का नाम काळे यांनी राज्य शासनाला दिला आहे जळगाव जिल्ह्यातील ग्राम पंचायत कर्मचारी महासंघाच्या दिलिप इंगळे राजू खरे सुनिल कोळी रतिराम राठोड आत्माराम मेहनकर, ज्ञानेश्वर पाटील तसेच अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वत्सलाबाई पाटील प्रेमलता पाटील, मंगला पाटील अरुणा पाटील, मंगला माळी, मंदा पाटील कोकीळा माळी, दिपाला चौधरी मिना नेहते जयश्री भारंबे, कल्पना पाटील आदी जळगाव चोपडा धरणगाव एरंडोल पाचोरा मूक्ताईनगर भुसावळ तालुक्यातील २०० कर्मचारींनी भागीदारी केली.
No comments:
Post a Comment