Sunday, 1 January 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिल्लोड येथे कृषि महोत्सवाचे उदघाटन !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिल्लोड येथे कृषि महोत्सवाचे उदघाटन ! 

औरंगाबाद/सिल्लोड, अखलाख देशमुख, दि १ : मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे  यांच्या हस्ते आज सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन झाले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, सहकारमंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील आदी मान्यवर उपस्थित होते. 

उद्घाटनानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रदर्शनातील विविध कृषी दालनांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतीतील नवतंत्रज्ञान, नवे प्रयोग याविषयी  शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांनी शेतीत केलेल्या नव्या प्रयोगाचे त्यांनी कौतुकही केले.


No comments:

Post a Comment

रिपोर्ट: सपोनि विनोद पाटील नेम. म.फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण प. यांच्याकडुन विषय म.फुले चौक पो.स्टे. कल्याण येचील बेवारस वाहनांची माहीती व...