Sunday, 1 January 2023

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा वाढदिवसात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा !

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा वाढदिवसात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा !

"चारा वाटप, ब्लॅकेट वाटप, शालेय साहित्याचे वाटप"

औरंगाबाद, अखलाख देशमुख,  दि : १ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या वेळी मुंबई येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर भेट देऊन आशिर्वाद घेतले. तसेच मातोश्री निवास्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यांच्या शुभेच्छा स्विकारत शिवसेना औरंगाबाद दिनदर्शिकेचे प्रकाशन केले.

खडकेश्वर येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे सौ. वैजयंती खैरे यांच्या हस्ते खडकेश्वर महादेव मंदिर येथे महारूद्राभिषेक व महाआरती करण्यात आली त्यानंतर गुलमंडी येथे गोरक्षक गोशाळेत चारा वाटप करण्यात आला. औरंगाबाद जिल्हापरीषद नागरीक, मतदार आणि शिवसैनिकांनी यो वेळी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, आमदार उदयसिंग राजपुत, मराठावाडा सचिव ऍड. अशोक पटवर्धन, माजी महापौर नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाल कुलकर्णी, उपजिल्हा प्रमुख कृष्णा डोनगावकर, बंडु ओक, शिंदे,  तांडवाडीकर, माजी आमदार संजय वाघचौरे, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, प्रभाकर मते,  युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, ऍड. आशुतोष डंख, सचिन खैरे,  विरभद्र गादगे, विजय साळवे, प्रफुल मालानी, पृथ्वीराज पवार, रतन घोगतें, डॉ. गोपाळ बचिरे, बाबासाहेब आगळे, दत्ता शिंदे,   विजय सूर्यवंशी,  महिला आघाडीच्या सुनीता आऊलवार, उपजिल्हा संघटक नलिनी बाहेती, अंजली मांडवकर, मिरा देशपांडे, लक्ष्मी नरहिरे, रूख्मिणी पवार, स्मीता जोशी, संगीता पाकेलो, राजश्री राणा, रेणुका जोशी, सुकन्या भोसले, तालुकाप्रमुख बंडू वाणी, राजू वरकड, युवासेनेचे विठ्ठल डमाळे, *उपशहर प्रमुख जयसिंग होलीये,* शाखाप्रमुख संदीप हिरे, छोटू गाडगे, सुभाष मुळे, किरण गणोरे, खंडू म्हस्के, नंदू जाधव, नानासाहेब पळसकर, सचिन गरड, विशाल खंडागळे, वर्षा जाधव, छाया जाधव, मीना पाटील, हर्षली मुठे, वनमाला पटेल, नारायण जाधव, संतोष जाटवे, मोहन मेघावाले,  जोगेंद्र चव्हाण, नरेंद्रसिंग जबिंदा, एसटी सेनेचे बोर्डे,  अदिंची उपस्थीती होती.

जोहरीवाडा  येथे गोशाळेत चारा वाटप....

जोहरीवाडा येथे गोशाळेत चारा वाटप करतांना माजी नगरसेवक सचिन खैरे, शाखाप्रमुख सचिन ठोकरट, उपविभागप्रमुख सचिन लकासे, अमोल गोसावी, महेश घोंगते, योगेश मिसाळ, अमोल खांडेकर, अभिजीत खैरे, रितेश जैस्वाल, प्रफुल वराडे, यांची उपस्थीती होती.

जटवाडा विटभट्टी कामगारांना ब्लॅन्केट वाटप

जटवाडा रोडवरील वीटभट्टी च्या ठिकाणी जाऊन केक कापून वीट भट्टी कामगारांसोबत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आपला वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. गोपाल बछिरे यांनी केले होते. याप्रसंगी माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी नगरसेवक भारत बरथुने, माणिक हिरेकर, प्रमोद घाटे, सुरेश गवळे, देविदास फुलमाळी, ऍड. संतोष बारसे, जय मांडवे श्री विकी फुलमाळी, प्रसेंजित बछिरे, समर्जित बछिरे, ईश्वर रेड्डी यांच्यासह शेकडो वीट भट्टी कामगार मजूर उपस्थित होते.

गुलमंडी कार्यालयात मोठी गर्दी
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी, शिवसैनिक, दाखल झाले होते. यावेळी आलाप ग्रुपचे अभिजित शिंदे, सरला शिंदे यांच्या समूहाचा बहारदार गीतांचा कार्यक्रम पार पडला.

No comments:

Post a Comment

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...