औरंगाबाद लोकसभेची_जागा_भाजपा_लढवणार
__ केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड
औरंगाबाद/कन्नड, अखलाख देशमुख, दि १ : औरंगाबाद मध्ये भारतीय जनता पक्षाचे यशस्वी राष्ट्रीय अध्यक्ष श्री.जगत प्रकाश नड्डा जी यांची दि.०२ जानेवारी २०२३ रोजीच्या सभेच्या पूर्वतयारी बैठक तसेच कन्नड तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या हस्ते कन्नड येथे संपन्न झाला. यावेळी ते आपल्या भाषणामध्ये बोलत असताना म्हणाले की औरंगाबाद लोकसभेची जागा भाजप कार्यकर्त्याच्या जोरावर पूर्ण ताकतीने लढवणार आणि जिंकणार असे मत त्यांनी व्यक्त केले तसेच राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा पदाधिकारी तथा सरपंच यांना केले.
यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांनी आपल्या भाषणात म्हणाले की कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाहीत कार्यकर्ता हा भाजपाचा मुख्य कणा आहे कन्नड तालुक्यातील कार्यकर्त्यांची फौज व फळी मजबूत असून तिच्या जोरावर आतापर्यंत सर्व इलेक्शन मोठ्या प्रमाणात जिंकल्या विधानसभेच्या असो की जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणूक असो कन्नड तालुका हा नेहमीच आघाडीवर राहिला आहे असे मत संजय केनेकर यांनी व्यक्त केले तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या सभेला आपण आवर्जून यावं असा आव्हान केलं तसेच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते यांनी आपल्या भाषणात प्रास्ताविक पर बोलताना भाजपाचा कन्नड तालुक्यात वाढलेल्या कामाचा आलेख व या सरपंच निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष आहे असा अधोरेखित केले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान कोल्हे ,जिल्हा परिषद सदस्य किशोर आबा पवार ,जिल्हा सोशल मीडिया चे संयोजक काकासाहेब तायडे ,प्रदेश कार्यकारणी सदस्य एकनाथ जाधव साहेब, भाजपाचे जिल्हा सचिव श्री डॉ संजय गव्हाणे ,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रदीप बोडखे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष अर्चना पवार अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गव्हाणे, जि प सदस्य सुरेश आण्णा गुजराने ,रमेश जाधव, सुनील निकम ,भगवान ठाकरे सर ,काकासाहेब आडे ,प्रशांत शिंदे, विलास इंगळे ,प्रशांत अग्रवाल, अजब सिंग राजपूत ,शहराध्यक्ष सुरेश डोळस गणेश घुगे ,प्रकाश शिरसे ,सुभाष बावस्कर ,देविदास उर्फ गप्पू दादा राठोड कल्याण जंजाळ ,कैलास जाधव ,उत्तमराव राठोड, कार्यक्रमाचे संयोजन सुभाष काळे यांनी केले भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment