"एक शाम सुरेशदादा जैन के नाम"
मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला मुशायरा!
जळगाव दि २ : माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यावर जळगावकरांचे निस्सीम प्रेम आहे,हे सर्वश्रुत आहेच. याचा परिचय पुन्हा मावळत्या २०२२ च्या ३१ डिसेंबरला नागरिकांना आला. "एक शाम सुरेशदादा जैन के नाम" ऑल इंडिया मुशायर कार्यक्रमाला महापौरसह सामाजिक ,राजकीय क्षेत्रातील मंडळी तसेच नागरिकांची मोठी उपस्थिती राहिली.या बहारदार कार्यक्रमाने दि. ३१ डिसेंबर २०२२ शनिवार या वर्षातील शेवटच्या दिवसाची संध्याकाळ स्मरणीय ठरली.
शहरातील मदिना कॉलनी उस्मानिया पार्क येथे अल फुरकान फाउंडेशन या संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुरेशदादा जैन यांच्या कर्तबगार कामगिरीला उजाळा मिळाल्याने अनेक मान्यवरांनी सुरेशदादांच्या सान्निध्यानातील आठवणी व्यक्त केल्या.
यावेळी शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ञ संचालिका सौ. जयश्री सुनिल महाजन, माजी महापौर करीम सालार, मजिद जकेरिया,एजाज मलिक, इंजि. साजिद भाई हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. परिसरासह शहरातील अन्यत्र भागातील नागरिक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment