ठाण्यात महिलेला सोशल मीडियावर जॉबची पोस्ट बघण पडले महागात,५ लाख ३८ हजारांचा घातला गंडा !
भिवंडी, दि,२८, अरुण पाटील (कोपर) :
सोशल मीडियाचा वापर करून नोकरी देण्याच्या बहाण्यानं एका महिलेला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील चीतळसर तेथे हा प्रकार घडला असून. स्वतःची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, तिने पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिलीय. त्यावरून पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करू तपास सुरू केला आहे.
आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फक्त फोटो आणि मेसेज शेअर करण्यापुरता मर्यादित नाही. तर आता फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपसारखे प्लॅटफॉर्म आभासी केंद्र बनले आहेत. व्यवसाय, नोकरी शोधणं, पैसे मिळवणं या साठीदेखील हे प्लॅटफॉर्म वापरले जातात. मात्र, आता याचाच फायदा गुन्हेगार घेऊ लागलेत. सोशल मीडियाचा वापर करताना एक छोटीशी चूक महागात पडल्याची अनेक उदाहरणं आता समोर येतात.
नोकरी शोधणाऱ्यांसाठीसुद्धा हे प्लॅटफॉर्म आता सुरक्षित राहिलेले नाहीत. येथे नोकऱ्या देण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगार लोकांकडून पैसे घेऊन गायब होत आहेत. असाच एक प्रकार नुकताच समोर आलाय. मुंबईतील एका महिलेला नोकरी देण्याच्या बहाण्यानं लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
ठाणे _चीतळसर येथील एका २६ वर्षीय महिलेची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. तिला नोकरी देण्याच्या नावाखाली ५,३८,१७३ रुपयांना गंडा घालण्यात आला. संबंधित महिला इन्स्टाग्रामवर स्क्रोल करत असताना एका पेजवर तिनं नोकरीची जाहिरात पाहिली. त्यानंतर तिनं संबंधित नोकरीच्या जाहिरातीवर क्लिक केले. त्यामुळे ती इन्स्टाग्रामच्या पेजवरून एका वेबसाइटवर गेली. त्या नंतर महिलेनं वेबसाइटवरील सूचनांचं पालन करीत सर्व तपशील भरले. त्यानंतर महिलेला ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगण्यात आले. विशेष म्हणजे, संबंधित महिलेनं या वेबसाइटवर ६ दिवसांत एकूण ५,३८,१७३ रुपये भरले.इतके पैसे दिल्यानंतर महिलेनं नोकरीसाठी संबंधित वेबसाइटवर असलेल्या नंबरवर फोन केला, पण तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर नोकरीची पोस्ट पाहाल, तेव्हा प्रथम संबंधित कंपनीची अधिकृत वेबसाइट शोधा. तसंच पोस्ट खरी आहे की नाही, ते तपासा.
सायबर गुन्हेगार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर क्लिक बाइट हेडलाइन देऊन लोकांना आमिष दाखवतात आणि पैसे कमवतात, हे लक्षात ठेवा.
कंपनीचे नाव ऑनलाइन शोधा. ही कंपनी अस्तित्वात आहे किंवा नाही, हे तपासा. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर असलेल्या फोन नंबरवर संपर्क करा.
सोशल मीडियावर असणारी जाहिरात बारकाईने पहा. त्यात व्याकरणाची चूक असू शकते. अनेकदा गुन्हेगार फार शिकलेले नसतात, आणि इंग्रजी लिहिण्यात चुका करतात. त्यामुळे सावधानता पाळण्याचे आवाहन पोलीस नेहमी करत असतात.
No comments:
Post a Comment