Saturday, 28 January 2023

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सततच्या बदलत्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यामध्ये संभ्रम, युती न केल्यास जबर फटका ?

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सततच्या बदलत्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यामध्ये संभ्रम, युती न केल्यास जबर फटका ?

कल्याण,(संजय कांबळे) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर वंचित आघाडीचे अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर यांनी युती केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात वंचित सह बहुजन समाजात आनंदाचे व प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असतानाच आता दस्तुरखुद्द प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सह शिवसेनेचे खासदार तथा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे विश्वासू संजय राउत यांच्या वर जहरी टिका करत आहेत. त्यामुळे शिवसेनेशी वंचित ची झालेली युती तुटते की काय? अशी शंका निर्माण होत असतानाच अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे मिडिया समोर विविध वक्तव्ये करत असल्याने कार्यकर्त्यामध्ये कमालीचा संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तर युती तुटल्यास याचा 'जबर फटका' वंचितला बसू शकतो.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्तेत सहभागी व्हा, असे सांगितले होते. परंतु दुर्दैवाने आजपर्यंत स्वतःच्या ताकतीवर राज्यात किंवा देशात सत्ता काबीज करता आली नाही. हे सत्य कोणीही नाकारु शकत नाही.अशातच भीम अनुयायांच्या शेकडो संघटना, पक्ष, गट तट, याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील बहुजन समाजाला बसला.

सुदैवाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटूंबातील अँड प्रकाश आंबेडकर यांनी अठरापगड जातींना एकत्र करून वंचित बहुजन विकास आघाडी स्थापन केली. यामध्ये एम आय एम देखील सहभागी झाली. वंचितच्या रुपाने महाराष्ट्रात प्रबळ असा तिसरा पर्याय लोकांना मिळाला. यावेळी वंचितने भाजप सोडून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्याशी युती करावी असे जवळपास सर्वानाच वाटत होतं. परंतु प्रकाश आंबेडकर यांनी याला साफ नकार दिला. यावेळी रिपब्लिकन जनता सगळे गटतट विसरून वंचित च्या अर्थात प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. याचा जबरदस्त फटका काँग्रेस व राष्ट्रवादी ला बसला, वंचितांच्या अनेक उमेदवारांनी कमीत कमी १ लाख व जास्तीत जास्त साडेतीन ते चार लाखावर मते घेतली होती.

सध्या महाराष्ट्रातील राजकारण भयावह झाले आहे. सुडाच्या राजकीय खेळीने केव्हांच पातळी ओलांडली आहे. अशातच गद्दारी, खोके, उद्योग बाहेर जाणे, महागाई, बेरोजगारी, अशा आरोपांनी भलतीच पातळी गाठली आहे. शिंदे फडणवीस सरकारवर जनता कमालीची नाराज आहे. हे अनेकांच्या भाषणातून स्षट होत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. महाविकास आघाडी एकसंघ राहिल्यास सध्याच्या सत्ताधाऱ्यांना सत्ता कायम ठेवणे अवघडच नाही तर कठीण जाणार आहे.

अशा वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपत काही गोष्टींचा त्याग करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर युतीची घोषणा केली. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. उलट आंबेडकरांनी महाविकास आघाडीत सामिल व्हावे अशीच इच्छा अनेकांनी बोलून दाखविली. सध्या वंचित मध्ये एम आय एम नाही, तरीही राज्यातील अनेक जिल्ह्यात, तालुक्यात, गावा गावात वंचितची ताकत आहे. अगोदरच बहुजन समाजाच्या फायरब्रांड नेत्या सुषमा अंधारे या संकटकाळात उध्दव ठाकरे यांच्या पक्षात सामिल झाल्याने त्यांची ताकत वाढली आहे, शिवाय त्यांनी काढलेल्या महाप्रबोधन यात्रेमुळे राजकारण ढवळून निघाले आहे.अशा सकारात्मक परिस्थितीत वंचितची युती नक्कीच परिणाम कारक ठरणार आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षाची महाविकास आघाडी आहे, या युतीचे शिल्पकार शरद पवार असले तरी उध्दव ठाकरे यांचे विश्वासू  कठ्ठर शिवसैनिक खासदार संजय राऊत यांचा सिंहाचा वाटा आहे. असे असताना वंचित चे अध्यक्ष, प्रकाश आंबेडकर हे शरद पवारासह संजय राऊत यांच्या वर कडवट टिका करत आहेत. मधेच,, भाजपाने मनुस्मृती सोडली तर त्यांच्याशी देखील युती करु ,असे वक्तव्य करत आहेत. या सगळ्या वक्तव्यामुळे वंचित शिवसेना यांच्या युतीमुळे आंनदी झालेले कार्यकर्ते व बहुजन समाज मात्र पुरता गोंधळून गेला आहे. आता कोणत्याही परिस्थितीत वंचित ने युती तोडू नये अशी भावना प्रत्येकाने बोलून दाखवली आहे.

मागील वेळी वंचित मित्रपक्षात सामिल न झाल्याचा फटका काँग्रेसला तर फायदा भाजपाला झाला. पण यामध्ये वंचित कुठे? हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे आता सुदैवाने संधी आली आहे. याचा अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन वक्तव्ये करावीत असे सगळ्यांना वाटते. तसे न झाल्यास आम्ही वंचित मधून बाहेर पडू असे काही जबाबदार वंचितांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

रिपोर्ट: सपोनि विनोद पाटील नेम. म.फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण प. यांच्याकडुन विषय म.फुले चौक पो.स्टे. कल्याण येचील बेवारस वाहनांची माहीती व...