सौ. अनिता नितीन वानखडे यांचे विविध मागण्यासाठी उपोषण !
औरंगाबाद दि २८ : सामाजिक कार्यकर्त्या सौ.अनीता वानखडे हया २५ जानेवारी पासुन खालील विविध मागण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालया समोर उपोषणास बसल्या आहेत "आज उपोषणाचा चौथा दिवस" आहे
1) पैठण तालुक्यातील *पिंपळवाडी येथील मधील x24x25 भुखंड* तत्काळ जप्त करून भुखंड धारकावर फसणुकीचा गुन्हा दाखल करणेबाबत........
2) पैठण तालुक्यात *पूर्ण वेळ तहसीलदार नियुक्ती* करणेबाबत.
3) पैठण तालुक्यात *पूर्ण वेळ गटविकास अधिकारी* यांची नियुक्त करणेबाबत.
4) जायकवाडी धरण नजीक *भुंकप्रमापनयंत्र* बसविणेबाबत.
5) पैठण ते औरंगाबाद या रोडवरील चित्ते गाव या ठिकाणवरील *टोल बंद करणेबाबत*.
6) पैठण तालुक्यातील सर्व कार्यालयात *नागरीकांची सनद* प्रथम दर्शनी भागात लावणे बाबत.
7) पैठण तालुक्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील घरकुल योजनेच्या बांधकामासाठी *वाळू धोरणाची* अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितांना आदेशित करणेबाबत.
8) श्री राजु काशीनाथ सुरे मुख्य अग्निशमन अधिकारी महानगरपालिका औरंगाबाद यांचा *पदभार* काढून त्यांची विभागीय चौकशी करून कारवाई करणेबाबत.
9) *आर्थिक गैरव्यवहार* करणारे अधिकारी *चंद्रकांत प्रकाश शेळके तत्कालीन तहसीलदार पैठण यांची विभागीय चौकशी करताना त्यांना सहकार्य करणारे उपविभागीय अधिकारी पैठण फुलंब्री *डॉ.स्वप्नील मोरे* या दोघांचे *विभागीय चौकशी* करून कारवाई करण्यात यावी
१०)पैठण धरणातील *गाळ* आधुनिक यंत्राच्या साहाय्याने काढणे बाबत....
११)अब्दुल्लापुर तांडा या *तलावाच्या* कामासह सोबत असलेल्या ६ कामाचा केलेल्या कामाचा पंचनामा करून दोषींवर गुन्हा दाखल करणेबाबत ...
१२)पैठण तालुक्यातील *मनेरेगा अंतर्गत* त्रयस्थ समितीने चुकीचा, दिशाभूल करणारा खोटा अहवाल वरिष्ठांना पाठवला असून तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची पुन्हा फेर चौकशी करून *समितीचे अध्यक्ष डॉ स्वप्नील मोरे उपविभागीय अधिकारी पैठण- फुलंब्री* तसेच सर्व समितीचे सदस्य यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
१३) पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना *अतिवृष्टी व संततधार पावसामुळे नुकसान भरपाई* मिळतेबाबत....
No comments:
Post a Comment