Tuesday 17 January 2023

भिवंडी तालुक्यातील कोपर गावात १५ वर्षातील पहिली ऐतीहासिक ग्राम सभा संपन्न !

भिवंडी तालुक्यातील कोपर गावात १५ वर्षातील पहिली ऐतीहासिक ग्राम सभा संपन्न !

*गावच्या विकासावर झाली चर्चा, अनधिकृत नळ जोडण्या होणार खंडित*

 अरुण पाटील, कोपर (भिवंडी)‌‌ : 
          राज्यात सर्वच ग्रामपंचायती तर्फे ग्राम सभा व विशेष ग्रामसभा आयोजित केल्या जात असतात.मात्र भिवंडी तालुक्यातील कोपर ग्रामपंचायीतर्फे पूर्वी  आयोजित केलेल्या  ग्रामसभा ही गेल्या १५ वर्षात कधीच पहिल्याच  कोरममध्ये पार पडल्या नाहीत.पहिल्या ग्राम सभेला ग्राम सभा सदस्य हे पाठ फिरवत असल्या कारणाने कोरम अभावी ग्राम सभा या दर वेळेस रद्द कराव्या लागत असे. 
           मात्र आज मंगळवार दि,१७ रोजी जनतेतून निवडून आलेले नवनियुक्त सरपंच श्री.हेमंत घरत यांनी पहिल्या ग्राम सभेचे आयोजन  केले होते. आयोजित केलेली ही ग्राम सभा पहिल्यादाचं कोरम पूर्ण करून मोठ्या उत्चाहात निर्विवाद संपन्न झाली.या ग्राम सभेचे वैशिष्ट म्हणजे गेल्या १५ वर्षात काही अपवाद वगळता  ग्रामसभा या पहिल्या कोरम मध्ये कधीच पुर्ण झाल्या नसून त्या  कोरम अभावी रद्द कराव्या लागत असे.त्यामुळे ही ऐतहासिक ग्राम सभा असून ती पहिल्याच झटक्यात निर्विवाद पार पाडल्याचे ग्रामस्थ तथा ग्रामसभा सदस्य श्री.भारत पोशा पाटील यांनी प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले.
            या पहिल्या ग्रामसभेत गावच्या विकासावर चर्चा करण्यात आली तसेच भविष्यात विकासावर होणाऱ्या खर्चाचे अंदाज पत्रकाचे वाचन करण्यात आले तर सद्या ग्राम पंचायत हद्दीत सुरू असलेल्या मे.आद्रिका बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या ठिकाणी बेरोजगारांना रोजगाराच्या संध्या कश्या उपलब्ध होतील यावर चर्चा करण्यात आली.तसेच दुसऱ्या ग्राम पंचायत हद्दीत राहणाऱ्या रहवाशांनी अनधिकृतपणे नळ जोडणी  घेतल्याने त्या नळ धारकांना त्या बाबत नोटिसा देऊन  नळ जोडण्या खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच नळ पाणी पुरवठा सुरळीत चालावा  त्यासाठी नळ पाणी पुरवठा समिती गठित करण्यात आली आहे. 
         या ऐतिहासिक ग्राम सभेस गावातील ज्येष्ठ पत्रकार श्री.अरुण पाटील,तंटामुक्त अध्यक्ष श्री.ज्ञानेश्र्वर भंडारी,ज्येष्ठ नागरिक श्री. दत्तात्रेय घरत, माजी ग्राम पंचायत सदस्य श्री.रुपेश घरत,रंजन पाटील, दत्तात्रेय काशिनाथ पाटील, पारूनाथ पाटील, भारत पो.पाटील,सोपान पो.पाटील, केशव पाटील,संतोष गो.पाटील,संतोष म्हात्रे,विनोद पाटील,संदीप सु पाटील,विलास घरत, व ईतर मान्यवर ग्रामस्थ हजर होते.
        तसेच ग्रामसभा अध्यक्ष तथा सरपंच श्री.हेमंत घरत, ग्राम सेविका तथा ग्रामसभा सचिव सौ.ज्योति चौरे मॅडम,उप सरपंच सौ.अस्मिता घरत , सदस्य सौ. अरुणा पाटिल, सदस्या सौ.विमल पाटील, सदस्या सौ. भाग्यश्री पाटील, सदस्या सौ.कोमल पाटील, सदस्य श्री.संजय पाटील,सदस्य श्री.प्रभाकर पाटील, सदस्य  श्री.देवेन घरत, सदस्य श्री. यातिश म्हात्रे हे कमिटी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

महाआघाडीतील विसंवाद यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचा विजय मोठ्या मताधिक्याने !! कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ, उल्हास...