भिवंडीतील ग्रामीण भागात माघी गणेश जयंती उत्सव उत्साहात, उत्सवाच्या संख्येत वाढ !
भिवंडी, दि,२३, अरुण पाटील (कोपर)
माघी महिन्यातील गणेश जयंती उत्सवाला आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्वांचा लाडका बाप्पा २५ जानेवारी रोजी वाजत गाजत घराघरात विराजमान होणार असून त्याची तयारी आता जवळपास पूर्ण होत आलेली आहे. मूर्तिकार गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवताना दिसत असून भिवंडीतील ग्रामीण भागात हा उत्सव उत्साहात पार पडत असून सद्या ग्रामीण भागात गणेश उत्सवाच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
भिवंडी तालुक्यातील कोपर गावातील कै.सखाराम पाटील यांनी सुरू केलेल्या पाच दिवसीय माघी गणेश उत्सवास ४९ वर्ष पूर्ण झाली असून आता त्यांचे पुत्र श्री. लहूनाथ सखाराम पाटील व हरेश सखाराम पाटील हे साजरे करत असून पूर्वी हजारोंच्या संख्येत भाविक दर्शन घेऊन महा प्रसादाचा लाभ घेत असल्याची माहिती हरेश पाटील यांनी प्रतिनिधी जवळ बोलताना दिली.
तसेच याच गावातील श्री. दत्तात्रेय काशिनाथ पाटील व सौ. वैजयंतीबाई दत्तात्रेय पाटील यांनी सुरू कलेल्या दीड दिवसीय माघी गणेश उत्सवास २२ वर्ष पूर्ण झाली असून या दिवसात गणेश भक्त मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी हजेरी लावत असतात.
वास्तविक माघ महिन्यात घराघरात गणपती बाप्पा विराजमान करण्याचं प्रमाण दरवर्षी वाढत आहे. या कारणास्तव गणपती बाप्पाच्या विविध रूपांतील छोट्या व सुंदर मूर्त्या भक्तांचे आकर्षण बनत आहेत. करोनाच सावट पूर्णतः दूर झाल्याने हा उत्सव आता पुन्हा एकदा धुमधडाक्यात साजरा होणार आहे.
२५ जानेवारीला गणपती बाप्पाच आगमन होत असून दीड दिवसाच्या गणपतीला २६ जानेवारीला बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. विशेष करून गणेश चतुर्थी अर्थात भाद्रपद महिन्यामध्ये अनेक ठिकाणी गणपती बाप्पाचं आगमन होत आहे.
परंतु सद्या माघ महिन्यांमध्ये अनेक भाविक गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान करत असतात. भाविकांन मध्ये श्रद्धा वाढत असल्याने दरवर्षी गणपती उत्सवामध्ये वाढ होताना दिसत आहे. अनेक भक्तगण या दिवसांमध्ये गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान करतात. विशेष म्हणजे वर्षानुवर्षे चालू असलेली ही परंपरा असून दरवर्षी या मध्ये अधिकाधिक भर होताना दिसत आहे.
गणेश जयंती निमित्ताने तीन योग होत आहेत. परिघ योग सकाळपासूनच असेल, जो संध्याकाळी ६:१६ पर्यंत असेल. त्यानंतर शिवयोग सुरु होईल. या दिवशी रवी योग सकाळी ०७:१३ ते रात्री ०८:०५ पर्यंत असेल. तर भाद्र आणि पंचक देखील गणेश जयंतीला असतात भाद्र आणि पंचक देखील आहे. २५ जानेवारी रोजी पंचक संपूर्ण दिवस आहे आणि भाद्रा सकाळी ०७:१३ ते दुपारी १२:३४ पर्यंत आहे.
No comments:
Post a Comment