Thursday, 26 January 2023

रत्नागिरी जिल्ह्यातील "फणसवळे" गावचं "श्री हनुमान सेवा मंडळ, निर्मित लोकप्रिय नमनचे मुंबई रंगभूमीवर आयोजन !

रत्नागिरी जिल्ह्यातील "फणसवळे" गावचं "श्री हनुमान सेवा मंडळ, निर्मित लोकप्रिय नमनचे मुंबई रंगभूमीवर आयोजन !

मुंबई - (शांताराम गुडेकर /दिपक कारकर )

              "सांस्कृतिक" वारसा लाभलेल्या महाराष्ट्राला लोककलेची फार मोठी परंपरा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विविध लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोध करत जनजागृती करण्याचे महान कार्य अनेक लोकशाहीर, लोककलावंतांनी केला आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राला गौरवशाली सांस्कृतिक परंपरा कायम आहे. महाराष्ट्रातील अनेक लोककला काळानुसार लोप पावत चालल्या असताना कोकणात अनेक गाव-वाडी कुशीत काही लोककला फक्त सणासुदीलाच सादरीकरण होत असून त्या मर्यादित न ठेवता त्या मध्ये पारंपरिक आणि आधुनिक समतोल साधून त्या जिवंत राहिल्या पाहिजेत,व्यावसायिक झाल्या पाहिजेत यासाठी कोकणातील बरेच लोक आपआपल्या प्रमाणे प्रयत्न करीत आहेत. 

              त्यापैकीच एक कोकणात नावलौकिक मिळवलेलं मु.फणसवळे ता.जि. रत्नागिरी मधील "श्री हनुमान सेवा मंडळ होय.उपरोक्त मंडळाच्या वतीने कोकणातील बहुप्रिय लोककला "नमन" कलेचा ह्या मोसमातील शुभारंभ प्रयोग बुधवार दि.०१ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रौ ०८ : ३० वा.मा.दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले (पूर्व) मुबंई येथे आयोजित करण्यात आला आहे.
            "पुरुष-पात्राने" सादरीकरण होत असलेल्या या नमननाट्य प्रयोगातून पौराणिक कथेवर आधारित गण- "प्रकटला सिद्धिविनायक" त्याचबरोबर सुरेल संगीत, रंगतदार गाणी, साज शृंगारमय नृत्यविष्कार, गवळण मधून राधा-कृष्णाची रासलीला सोबत, सतीश रामचंद्र जोशी- लिखित/दिग्दर्शित, सह सुनील विठ्ठल रेवाळे दिग्दर्शित- विनोदी वगनाट्य -"परदान्या जिता हाय" ही एक दर्जेदार अशी नाट्यकलाकृती सादरीकरण होणार असून कुटुंबासमवेत आवर्जून पाहण्यायोग्य हा कार्यक्रम अगदी रसिकांत उत्सुकता लागून राहिली आहे.एक आगळीवेगळी नाट्यकृती प्रतिवर्षी रसिक मनावर अधिराज्य गाजविताना ह्या नमन मंडळाचे लेखक सतीश रामचंद्र जोशी, दिग्दर्शक सतीश जोशी/ सुनिल रेवाळे, नृत्यदिग्दर्शिका- तेजल पवार-गोताड, गीतरचना सतीश रामचंद्र जोशी/युवराज जोशी, पार्श्वगायक सतीश रामचंद्र जोशी/ अमोल कानसे/ संदेश पालकर/ सुजय माने, पार्श्वगायिका तेजल पवार-गोताड, ढोलकी/मृदुंग प्रभाकर मास्कर, पॅड - कल्पेश ओर्पे/ रूपेश शेलार, कीबोर्ड-संदेश गोताड/संदेश आंबेकर, पार्श्वसंगीत-योगेश बांद्रे, रंगभूषा-रमाकांत घाणेकर, वेशभूषा-सुभाष जोशी, नेपथ्य-सतीश रामचंद्र जोशी व मंडळाचे यशस्वी कलाकार यांच्या अथक परिश्रम पूर्वक निर्मितीतून साकारलेल्या ह्या नमन प्रयोगाला कोकणवासीय मुंबईकर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी युवराज जोशी - ८८७९८७१५०७, प्रदिप पाले - ९३२२३४१३४०, सचिन पाले - ९८२०६६२५८५ यांच्याशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांवरील अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटकाचा बुधवार १२ रोजी शुभारंभ !

छत्रपती संभाजी महाराजांवरील अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटकाचा बुधवार १२ रोजी शुभारंभ ! मुंबई, प्रतिनिधी‌ : आत्ताच्या सोशल मिडिय...