Monday, 23 January 2023

हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे चषक, मान्यवरांसह महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांची उपस्थिती !

हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे चषक, मान्यवरांसह महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांची उपस्थिती !

जळगाव, अखलाख देशमुख, दि २३  :  हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना, जळगाव महानगरपालिका आणि कैलास क्रीडा मंडळ यांच्या वतीने ‘स्व.बाळासाहेब ठाकरे चषक राज्यस्तरीय कबड्डी सर्प्धा 2023’चे अयोजन करण्यात आले आहे. दि.21 ते 23 जानेवारी दरम्यान शहरातील शिवतीर्थ मैदान (जी.एस.ग्राऊंड) वर पार पडणार्‍या या राज्यस्तरीय स्पर्धेला शनिवार, दि.21 जानेवारी 2023 रोजी जल्लोषात सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांसह शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका तसेच जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तसेच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करुन दीपप्रज्ज्वलन करुन करण्यात आले.

याप्रसंगी नाशिक पदवीधर निवडणुकीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील उपस्थित होत्या. तसेच यावेळी माजी महापौर तथा नगरसेवक नितीन लढ्ढा, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, नगरसेविका सौ.ज्योती तायडे,लक्ष्मीकांत चौधरी, राजू चौधरी,अजय जाधव, प्रा.डॉ.नारायण खडके, मंगला पाटील, गायत्री सोनवणे, नीलू इंगळे, विमल माळी,प्रशांत सुरळकर, पूनम राजपूत आदी मान्यवरांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहमदनगर, धुळे, मुंबई, बर्‍हाणपूर, शिरपूर, नंदुरबार या शहरातील सुमारे 300 हून अधिक खेळाडू स्पर्धक या ठिकाणी कबड्डी खेळणार असून ही स्पर्धा सकाळ आणि रात्रीच्या सत्रात खेळवण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

ज्येष्ठांनी मदतीसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन !!

ज्येष्ठांनी मदतीसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन !! पुणे, प्रतिनिधी : देशभरातील ज्येष्ठ नागरिक...