Monday, 23 January 2023

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येतील अशी अपेक्षा !

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येतील अशी अपेक्षा !

मुंबई, अखलाख देशमुख, दि २३ : आज वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना असे आम्ही दोघे एकत्र आलो आहोत. या निमित्ताने निवडणुकांमध्ये एक बदलाचं राजकारण सुरू झालं आहे. उपेक्षितांचे, मुद्द्यांचे राजकारण पुन्हा चालू होईल अशी आम्हाला खात्री आहे.असे एड.आंबेडकर यांनी सांगीतले.
 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सोबत येतील अशी अपेक्षा आहे. आमचं राष्ट्रवादी काँग्रेससोबत फक्त मुद्द्यांचे भांडण आहे. सध्या देशभर ED च्या माध्यमातून राजकीय नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आले नाहीये. प्रत्येकाला एक दिवस जायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पक्षातील लीडरशिप संपवली आहे. 

हुकूमशाहीविरोधात उभे राहणाऱ्या प्रादेशिक पक्षांना आमचा पाठिंबा असेल. राजकारण नितीमत्तेवर येईल असा आमचा प्रयत्न असेल. शिवसेना ही प्रबोधनकार ठाकरे यांच्या हिंदुत्त्वावर चालत आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. या हुकूमशाहीच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. त्यासाठी आम्ही एकत्र आहोत. असेही शेवटी बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगीतले.

No comments:

Post a Comment

ज्येष्ठांनी मदतीसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन !!

ज्येष्ठांनी मदतीसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन !! पुणे, प्रतिनिधी : देशभरातील ज्येष्ठ नागरिक...