देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा दीपप्रज्ज्वलन करून महापौरांचे हस्ते उद्घाटन !
जळगाव, अखलाख देशमुख, दि २३ : प्रजासत्ताक दिनानिमित्त लोकमत व आदित्य फार्मतर्फे ‘वंदे मातरम उत्सव तीन रंगांचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.23 ते 26 जानेवारी दरम्यान होणार्या कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांसह भव्य रॅलीचे ही आयोजन करण्यात येणार आहे. दि.26 रोजी एकाच वेळी शहरातील 26 चौकात राष्ट्रगीताचे गायन होणार आहे.
याअनुषंगाने सोमवार, दि.23 जानेवारी 2023 रोजी शहरातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे देशभक्तीपर सूमह गीतगायन स्पर्धेचे उद्घाटन शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या संचालिका तसेच जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आले. महापौरांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. आजच्या उद्घाटनप्रसंगी मंचावर शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, आदित्य फार्मचे संचालक सुनिल मंत्री, चांदोरकर प्रतिष्ठानचे दीपक चांदोरकर आदी मान्यवरांसह लोकमत समूहातर्फे सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी हे उपस्थित होते.
आज देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. मंगळवार, दि.24 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता देशभक्तीपर समूह नृत्य स्पर्धा होतील. या स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात आले आहेत. पहिल्या गटात इयत्ता चौथी ते सहावी तर दुसर्या गटात इयत्ता सातवी ते नववीचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. एका गटात किमान सहा विद्यार्थ्यांचा समावेश आवश्यक आहे. सखींसाठी एकल गीतगायन, नृत्य स्पर्धा सुद्धा आयोजिलेली आहे. दि. 25 जानेवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाजवळून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये विविध सामाजिक संस्था, संघटना व शाळेचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. शहरातील विविध भागातून निघालेल्या या रॅलीचा समारोप जिल्हा क्रीडा संकुलाजवळ होणार आहे. या सर्व कार्यक्रमात जळगावकरांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा उत्साहात साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment