Tuesday, 24 January 2023

शिवसेनेची वचिंत बहुजन विकास आघाडीशी युतीमुळे ठाणे जिल्ह्यात उत्साह, शहापूर, कल्याण, भिवंडी मुरबाड आदी ठिकाणी वंचित ची ताकद !

शिवसेनेची वचिंत बहुजन विकास आघाडीशी युतीमुळे ठाणे जिल्ह्यात उत्साह, शहापूर, कल्याण, भिवंडी मुरबाड आदी ठिकाणी वंचित ची ताकद !

कल्याण,(संजय कांबळे) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीबरोबर युती केल्याने ठाणे जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून याचा फायदा शिवसेसह वंचित ला पण होणार आहे..

ठाणे जिल्ह्यात भिंवडी, कल्याण, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ आदी ५ तालुक्यात वंचित ची ताकत आहे. अनेक ग्रामपंचायतीमध्ये संरपच, सदस्य, हे वंचित आघाडीचे आहेत. शिवाय प्रत्येक गावा गावात बहुजन समाज आहे. त्यातच आरपीआयचे अनेक गट तयार झाले. यामध्ये सर्वाधिक प्रभावशाली म्हणून वंचित पुढे येत आहे. हे मागील निवडणुकीत वंचितांच्या उमेवारानी घेतलेल्या मतांवरुन दिसून येत आहे. तसे पाहिले तर आजपर्यंत कधीही व कोणत्याही निवडणुकीत दलित मतदारांनी भाजपाला मतदान केले नाही. ही कठ्ठर मते एकवेळ काँग्रेस, राष्ट्रवादी ला मिळाली, पण भाजपाला नाही.

अगदी कल्याण तालुक्यातील वासुद्री, रायते, वरप, कांबा, मांजर्ली, म्हारळ, घोटसई, टिटवाळा, उशीद, शहापूर मधील शेरे वाशिद, शहापूर, उमरई तसेच मुरबाड मधील अनेक गावात दलित मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. याचा फायदा शिवसेनेला होणार आहे.

या अगोदरच बहुजन समाजातील फायरब्रांड नेत्या सुषमा अंधारे या ठाकरे गटात गेल्या आहेत. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग शिवसेनेकडे वळला आहे. अशातच आता वंचित चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हेही शिवसेने सोबत जात आहेत त्यामुळे नक्कीच शिवसेनेची ताकत वाढली आहे.याचा फटका भाजप व शिंदे गटाला बसणार आहे.

मागील निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील विविध मतदारसंघात वंचित च्या उमेदवारांनी विचार करायला लावणारी मते घेतली होती. आतातर कांग्रेस, राष्ट्रवादी पक्षही बरोबर आहे. त्यांमुळे याचा चांगला परिणाम भविष्यात दिसून येणार आहे. आरपीआयचे इतर गटाच्या नेत्यापेक्षा वंचित च्या प्रकाश आंबेडकर यांची ताकत खूप मोठी आहे. फक्त सर्वांनी प्रामाणिकपणे काम करायला हवे.

No comments:

Post a Comment

ज्येष्ठांनी मदतीसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन !!

ज्येष्ठांनी मदतीसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन !! पुणे, प्रतिनिधी : देशभरातील ज्येष्ठ नागरिक...