*"हाथ से हाथ जोडो"* अभियानाला औरंगाबाद येथे सुरवात !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २४ : *"हाथ से हाथ जोड़ो"* या अभियानाची सुरूवात आज औरंगाबाद जिल्हा काॅग्रेस कमिटी कार्यालय "गांधी भवन" शहागंज येथे काॅग्रेस पक्षाचा ध्वज फडकावून करण्यात आले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटीच्या आदेशानुसार "हाथ से हाथ जोड़ो" या अभियानाची सुरूवात करण्यात येत आहे.
भारतीय स्वातंत्र्यानंतर निघालेली ही ऐतिहासिक Bharat Jodo Yatra कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर मा. राहुल गांधी जी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही "भारत जोड़ो यात्रा" देशातील सर्वच राज्यात व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून जाऊ न शकल्यामुळे उर्वरित राज्यात व महाराष्ट्रातील उर्वरित सर्वच जिल्ह्यात ऐतिहासिक भारत जोड़ो यात्रेचे उदिष्टे व संदेश देशातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी व या यात्रेच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य जनता मा. राहुल गांधी यांच्याशी महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, नोकरभरती, खाद्यतेल, इंधनाचे वाढलेले भरमसाठ भाव आणि महिला, दलित, अल्पसंख्याक होणारे अन्याय अत्याचार, हल्ले, धार्मिक, जातीय ताणतणाव गेल्या ८-९ वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.
यासाठी केंद्रातील व राहतील ह्या हुकुमशाही सरकार विरोधात सर्वानी एकत्रित येण्यासाठी हे "हाथ से हाथ जोड़ो" अभियान राबविण्यात येत आहे व यातून देशातील व राज्यातील सर्व जाती धर्मातील जनतेला संघटित करून ह्या जुलमी व हुकुमशाही सरकार विरोधात बुलंद आवाज उठवण्याचे प्रयत्न केला जाणार आहे.
यावेळी औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी च्या वतीने औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांनी औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे प्रभारी पदी नियुक्ती झाल्याबददल आ.राजेश राठोड यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष शेख युसूफ लिडर, डॉ.जफर अहेमद खान, भाऊसाहेब जगताप, डॉ. पवन डोंगरे, अनिस पटेल, एकबालसिंग गिल, सागर नागरे, अॅड.सय्यद अक्रम, अरुण शिरसाठ, एम.ए.अजहर, अथर शेख, अनिल माळोदे, प्रा.प्रकाश वाघमारे, केशव नामेकर, बबन डिंडोरे पाटील, कैसर बाबा,आसमत खान, रवि लोखंडे, अशोक डोळस, अनिता भंडारी, दिपाली मिसाळ, रेखा राऊत, स्वाती सरवदे, माधवी चंद्रकी, मंजु लोखंडे, अरुणा लांडगे, जानु पटेल, शेख रईस, मदनकाका सातपुते, चंद्रकांत बनसोडे, जगन्नाथ ढाकणे, आनंद भामरे, विनायक सरवदे, मुख्तार शेख, साजीद कुरैशी, योगेश थोरात, संतोष भिंगारे, शफीक शाह, निर्मला शिखरे, रुख्मणी खंडागळे, हरचरणसिंग गुलाटी, शेख गफुर, अॅड.संदीप नरवडे, संदीप जाधव, साहेबराव बनकर, उमाकांत खोतकर, टी.एस.चव्हाण, किशन पवार, सुनिल वाहुळ, शाहराज कांबळे, शिवाजी चिंचोळे, आसाराम कनसे, सय्यद युनुस, शेख फैज, शिवा गवळे, सलीम खान, सय्यद फयाजोददीन याच्या सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment