Tuesday, 24 January 2023

सुधारित वेळापत्रकाचा ७५,००० विद्यार्थ्यांना होणार फायदा !

सुधारित वेळापत्रकाचा ७५,००० विद्यार्थ्यांना होणार फायदा !

पुणे, अखलाख देशमुख‌, दि २४ : अभियांत्रिकी शाखेच्या द्वितीय वर्षातील सत्र परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी काल महाराष्ट्र प्रदेश, पुणे जिल्हा NSUI व विद्यार्थ्यांनी केली होती. 

अभ्यासक्रम पूर्ण न शिकविताच परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या तसेच दोन पेपरमध्ये गॅप न देता सलग पेपर घेण्यात येणार होते. यावर काल महाराष्ट्र प्रदेश, पुणे जिल्हा NSUI व विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या दालनाबाहेर आंदोलन केले होते परंतु फक्त आश्वासन देऊन काल विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यात आली होती म्हणून आज पुन्हा विद्यापीठावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू संजीव सोनवणे सर यांनी NSUI व विद्यार्थी प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून त्या आम्ही मान्य करीत असल्याचे जाहीर केले व तात्काळ सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले. द्वितीय वर्षातील जवळजवळ ७५,००० विद्यार्थ्यांना या निर्णयाने फायदा होणार आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अँड. अमीर भाई शेख, प्रदेश उपाध्यक्ष अँड. उमेश खंदारे, पुणे जिल्हाध्यक्ष भूषण रानभरे, सरचिटणीस महेश कांबळे, आळशी इंजिनियर या युट्यूब चॅनेलचे रौनक सर, प्रसन्न मोरे, राज जाधव, अजिंक्य हळदेकर, शालिनी चव्हाण व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

ज्येष्ठांनी मदतीसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन !!

ज्येष्ठांनी मदतीसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन !! पुणे, प्रतिनिधी : देशभरातील ज्येष्ठ नागरिक...